मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जून 2018 (13:48 IST)

नवाझने दिल्या 'ड्राय डे' सिनेमाला शुभेच्छा

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील निर्मित, पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या आगामी सिनेमाच्या ट्रेलरने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तरुणाईची मौजमस्ती आणि एका रात्रीची धम्माल गोष्ट सांगणारा हा सिनेमा १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 'ड्राय डे' सिनेमाबद्दल सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड स्टार नावाझुद्दीन सिद्धिकीने 'ड्राय डे' सिनेमासाठी अभिनेता ऋत्विक केंद्रेला भरपूर शुभेच्छा दिल्या. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरची लिंकदेखील त्याने आपल्या ट्वीटरवर पोस्ट केली असल्यामुळे, 'ड्राय डे' बाबत सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
सुपरहिट गाण्यांचा तडका आणि तरुण कलाकारांचा ताफा असलेल्या या सिनेमात ऋत्विक केंद्रे, चिन्मय कांबळी, कैलास वाघमारे, पार्थ घाटगे, मोनालिसा बागल, आयली घिए, सानिका मुतालिक हे नवोदित कलाकार आपल्याला पाहता येणार आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव लिखित या आगळ्या वेगळ्या 'ड्राय डे'ची पटकथा आणि संवाद नितीन दीक्षित यांनी लिहिले आहेत.