गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (13:34 IST)

सचिन दरेकर यांची 'पार्टी'

आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून 'झेंडा'. 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणारे, सूप्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर, आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. 'पार्टी' असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात २४ तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. 
 
नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या 'पार्टी' या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांचे चेहरे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर पोस्टरवर लपवण्यात आली असल्यामुळे, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.