मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 1 जानेवारी 2023 (11:45 IST)

माझी तुझी रेशीम गाठ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप !

majhi tujhi resham gath
टीव्हीच्या मालिका टीआरपी घसरल्यामुळे बंद होतात. त्यांची जागा नवीन मालिका घेतात. आता लोकमान्य आणि अगं अगं सुनबाई , काय म्हणता सासूबाई या दोन्ही मालिका सुरु झाल्यावर आता जानेवारी महिन्यात 36 गुणी जोडी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या झी मराठी वरील मालिका माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका सेप्टेंबर महिन्यात नव्या वेळेत सुरु झाली असून आता त्यावेळेत '36 गुणी जोडी' या मालिकेचा प्रोमो झी मराठीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून ही मालिका 23 जानेवारी पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता येणार आहे. सध्या या वेळेत 'माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका येत आहे. त्यामुळे आता माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका निरोप घेणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 36 गुणी जोडीचा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक चिडले आहे. युजर्स म्हणाले की माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका पुन्हा त्याच्या वेळेत 8:30 वाजता सुरु करा. त्यामुळे आता माझी तुझी रेशीम गाठ प्रेक्षकांचा निरोप घेते का असा प्रश्न नेटकरी आणि प्रेक्षक करत आहे. 

36 गुणी जोडी ही मालिका येत्या 23 जानेवरी पासून सुरु होऊन या मालिकेत अभिनेता आयुष्य संजीव, आणि अभिनेत्री अनुष्का सरवटे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता आयुष्य बॉस माझी लाडाची सोनी मराठीवरील मालिकेत दिसला होता तर अनुष्का सरवटे हिने 'कारभारी लयभारी' या मालिकेत भूमिका साकारली होती. 
 
Edited By - Priya Dixit