शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (14:38 IST)

मालिकेत दाखवण्यात आलेला बिबट्या खरा, प्रेक्षकांनी ओळखलं

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेने फार कमी काळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. झी मराठीवरील या मालिकेत सगळ्यांचा लाडका राणादा म्हणजेच हार्दिक जोशी मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. परंतु, मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका सीनची सध्या सोशल मीडियावर जोरादार चर्चा सुरु आहे. ज्यात गावात बिबटयाचा वावरत  असताना दाखवण्यात आला आहे. 
 
मालिकेत हे फुटेज तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रित केले जात असले तरी चाहत्यांप्रमाणे हा यात दाखवण्यत आलेला बिबट्या खरा असल्याचं म्हणलं जात आहे. यात गुळपोळी गावात बिबट्या शिरल्याचं दाखवण्यात आलं असून देशमुखांच्या घराबाहेर बिबटयाचे ठसे आणि सीसीटीव्हत कैद बिबट्याचं फुटेज दाखवण्यात आले. परंतु या फुटेजमध्ये दाखवण्यात आलेला बिबट्या खरा असल्याचं प्रेक्षकांचे म्हणणं आहे. 
 
आता हे तं‍त्रज्ञान की हा खरा बिबट्या आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण नाशिकमध्ये केले जात आहे. मालिकेचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी काही दिवस सेटवर बिबट्याचा वावर होता असं तिथल्या लोकांचे म्हणणे पडले. अशात तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला खरा बिबट्या आता मालिकेत कथानकाच्या स्वरूपात दाखवण्यात येत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
 
मालिकेत दाखवण्यात आलेला बिबट्या खरा की खोटा याबद्दल टीमकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.