शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (18:13 IST)

सुयश-आयुषीने बांधली लग्नगाठ, फोटो बघा

मराठमोळा अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे विवाहबंधनात अडकले. राजर्षी मराठीने इन्स्टावर सुयश आणि आयुषीच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
 
यात दोघांची जोडी देखणी दिसून येत आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. गेले दोन दिवस सुयशच्या लग्न तयारी तसेच मेहंदी, हळद तसेच संगीत याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
संपूर्ण सोहळा कोरोनाचे नियम पाळून पार पाडण्यात आला. नातेवाईक आणि मित्रांसह काही कलाकार मंडळींनी देखील या कार्यक्रमाला हजेली लावली होती. सुयशने सोहळ्याचे फोटो इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केले होते.
 
मराठमोळा अभिनेता सुयश टिळक 'तू तिथे मी' या मालिकेतून घराघरात पोहोचला होता. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच सुयशने अभिनेत्री आयुषीसोबत गुपचूप आपला साखरपुडा उरकून सर्वांना सुखद धक्का दिला होता.
 
या दोघांच्या साखरपुडा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.