testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आज नाटक “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ”प्रस्तुती

marathi natak
Last Modified सोमवार, 18 डिसेंबर 2017 (13:11 IST)
१९ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.००
वाजता 'अनहद नाद unheard sounds of universe' -
“अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” हे नाटक कलात्मक गरजांचा शोध घेतं. जे कला व कलाकाराला उत्पादिकरणाच्या बंधनातून मुक्त करते. कारण, कला हि उत्पाद आणि कलाकार हा उत्पादक नाही आणि जीवन नफा - तोट्याची बैलेंसशीट नाही. याचकरिता हे नाटक, कला आणि कलाकाराला उत्पाद आणि उत्पादिकरणांमुक्त करते. त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक उर्जेने उत्तम आणि सुंदर विश्व निर्मिती करण्यासाठी प्रेरित आणि प्रतिबद्ध करते.
थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताला १२ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या रंगयात्रेची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या २५ वर्षात “थियेटर ऑफ रेलेव्हन्स”नाट्य दर्शनाने देश-विदेशात आपली जागतिक ओळख, स्वीकृती मिळवली आहे.

१९९० नंतर जागतिकीकरणाचा युग सुरु झालं. त्या जागतिकीकरणात बोललं जात जग जवळ आले खरतर जग जवळ आले. पण, माणसा- माणसातील संवाद कमी झाला. अर्थ कमविण्यासाठी धावपळ वाढली .त्यातच मानवी मुल्यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली.
१९९० नंतरच्या अर्थहीन होण्याच्या काळात, एकाधिकारशाही आणि वर्चस्ववादी धोरणांच्या काळात, विज्ञान हे तंत्रज्ञाना पुरते सीमित होण्याच्या काळात, केवळ खरेदी- विक्री यांवर भर असण्याच्या या काळात जनतेला त्यांच्या मुद्यांसाठी "चिंतन”करण्यासाठी एका विचार मंचाची आवश्यकता आहे, या जाणिवेने १२ ऑगस्ट १९९२ पासून “थियेटर ऑफ रेलेवंस”हा रंग सिद्धांत जनतेसाठी 'चिंतन मंच' म्हणून उदयास आला.
“थिएटर ऑफ रेलेवंस”चे सिद्धांत :

1. असा रंगकर्म ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.

2. कला, कलेसाठी नसून समाजाप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करणारी असावी आणि हि कला लोकांच्या जीवनाचाच एक हिस्सा असावी.

3. कला जी मानवीय गरजांना पूर्ण करेल आणि स्वतःला अभिव्यक्ति माध्यमाच्या रुपात व्यक्त करेल.
4. जी स्वतःतील बदलांच्या माध्यमांचा शोध घेईल, स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे घेऊन जाईल.

5. असा रंगकर्म जो मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे स्रोत वा पद्धती बनेल.

( रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस”चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस”चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस”नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे.)

आज विकासाच्या नावाखाली एकच चढाओढ सुरु झालेली आहे. या चढा ओढीत एकाधिकाराचा सर्वीकडे गोंधळ सुरु झालेला आहे. गर्दीचा आवाज आणि कोलाहल यामध्ये आपला आवाज ,आपल्या अंतकरणातील आवाज हा दबला जात आहे. किंबहुना त्याला दाबण्याचा षड्यंत्र सुरु झालेला आहे. यातच, आज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात, माणसाने “माणूस”म्हणून राहणे हे एक आव्हान झाले आहे. मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “गर्भ”, “अनहद नाद –Unheard Sounds of universe” आणि “न्याय के भंवर में भंवरी”या क्लासिक नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आंतील आवाज ऐकवण्यासाठी, ही तीन कलात्मक नाटके घेऊन येत आहोत.
मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ”आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी”नाटकांची प्रस्तुती वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल. येथे अनुक्रमे १८ डिसेंबर २०१७ ला रात्रौ ८.३० वा , १९ डिसेंबर २०१७ ला सायं. ५.०० वा. आणि 20 डिसेंबर २०१७ रोजी रात्रौ ८.३० वाजता होईल.


यावर अधिक वाचा :

अनुष्का साकारणार जयललितांची भूमिका

national news
बाहुबली चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घालणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा ...

नाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'

national news
प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा 'अगडबम' सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या ...

अभिनेता दलीप ताहिल यांची दारुच्या नशेत रिक्षाला धडक

national news
अभिनेता दलीप ताहिल यांनी दारुच्या नशेत त्यांनी एक रिक्षाला धडक दिली. यावेळी पोलिसांनी ...

सुबोध श्रुतीचे 'ओ साथी रे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

national news
सनई-चौघडे,वरात घाई,नाचगाणी या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा ...

नेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी?

national news
अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...