testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चांगला नट म्हणून नाव कमवेन मगच लग्न !

sharad jadhav
Last Updated: मंगळवार, 26 सप्टेंबर 2017 (09:51 IST)
आंतराराष्ट्रीय जाहिरातीत झळकलेल्या मराठी अभिनेत्याची व्यथा
अभिनयाच्या वेडापायी घरदार सोडून मुंबईत दाखल झाले आणि यशस्वी झाले किंवा स्पॉटबॉय बनले अशा अनेक कथा आपण ऐकल्या आणि पाहिल्या. पण जोवर अभिनेता म्हणून नावारुपास येत नाही तोवर लग्नच करणार नाही, असा पण केलेला एक अभिनेता आहे...शरद जाधव! मराठीतला नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणून एकांकिका चळवळीत ओळखला जाणारा शरद जाधव, घुमा या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारतो आहे. फोक्सवॅगनच्या जर्मन, फेसबूकच्या अमेरीकन आणि पोलंडच्या मॉलच्या जाहिरातीत झळकलेल्या शरदने काही तेलगू जाहिरातीतून काम केले आहे. शरद, गेली १५ वर्षै नाटक, जाहिरात आणि सिनेमात अभिनयाच्या जोरावर मुख्य भूमिका मिळावी म्हणून धडपडतोय. परंतू, छोट्या-मोठ्या भूमिकांवरच त्याला आजवर समाधान मानावं लागल्याने त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या 34 व्या वर्षीही तो अविवाहीत आहे.
मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा- ख़डले परमानंदचा शरद जाधव, अभिनयाच्या वेडापायी शिक्षण अर्धवट सोडून पुण्यात दाखल झाला. पुण्यात टेक्सास गायकवाड यांच्या प्रबुद्ध रंगभूमी संस्थेतून एकांकिका-नाटकातून कामं करू लागला. बऱ्याच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकातून त्याने छोटी-मोठी
कामं केली. फोक्सवॅगन, फेसबुक सारख्या आंतरराष्ट्रीय जाहिरातीही केल्या परंतु स्वत:चं पोट भरण्याचीही भ्रांत झालेल्या शरद जाधवला घरातून विरोध होऊ लागला. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्याचं लग्न लावून देवू मग सुधरेल, या भाबड्या आशेपायी मुली पाहायला सुरूवात केली. आता आपल्याला कुठेतरी नोकरी करावी लागणार आणि आपलं ध्येय संपणार! यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शरदने घरच्यांना लग्न करेन पण अभिनेता म्हणून नावारूपास येऊनच करेन ! असं ठणकावून सांगितलं. तिथंपासून आजपर्यंत शरद अविवाहीत आहे. पण, आता घुमा या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित सिनेमात त्याला हिरो म्हणून भूमिका मिळाली आहे.
आपल्या हुशार मुलाला जिल्हापरिषदेच्या शाळेतून काढून इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या एका शेतकरी बापाची...’नामा’ची प्रमुख भूमिका शरद जाधव साकारतोय. या चित्रपटाची गोष्ट ही ‘नामा’ या व्यक्तिरेखेभोवती फिरते त्यामुळे शरद जाधव या चित्रपटाचा खरा हिरो आहे. आता मायबाप प्रेक्षकांच्या कृपाशिर्वादाने घुमा ला घवघवीत यश मिळू दे आणि माझ्या लग्नाकडे डोळे लावून बसलेल्या माझ्या आईबाबांचं स्वप्न आणि माझा कलेप्रती केलेला त्याग फळू दे! अशी आशा शरद जाधवने व्यक्त केली.


यावर अधिक वाचा :

मित्राचा फुकटचा सल्ला

national news
रमेश... मानसोपचार तज्ज्ञाकडे रोज रात्री झोपताना वाटणाऱ्या भिती बद्दल इलाज करायला ...

सैफ अली खान बनणार नागा साधू

national news
सैफ अली खानची नवीन वेब सिरीज 'द सॅक्रीड गेम्स' सध्या वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत आहे. या ...

'धडक'चा क्लायमॅक्स जान्हवीकडून लीक ?

national news
अभिनेत्री जान्हवीला 'धडक'च्या क्लायमॅक्सबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं याची कल्पना ...

नवरा-बायकोचं भांडण

national news
नवरा-बायकोचं भांडण होतं. बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण. नवरा - आय लव्ह ...

अक्षय कुमार माझा रोल मॉडेल

national news
अक्षय कुमारबरोबर 'टॉयलेट एक प्रेमकथा'मध्ये काम केलेली भूमी पेडणेकर अक्षयलाच आपला रोल ...