मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

रहाणेवर निवड समिती नाराज

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेने उत्कृष्ट कामगिरी केली. 5 सामन्याच्या या मालिकेमध्ये अजिंक्य रहाणेने लागोपाठ 4 अर्धशतकं झळकावली. या कामगिरीनंतरही अजिंक्य रहाणेला टी-20 सीरिजमध्ये डच्चू देण्यात आला. यानंतर रहाणे त्याची पत्नी राधिकासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे.
 
राधिका आणि अजिंक्य सेशल्समध्ये गेले आहेत. 2017'18 च्या रणजी मोसमाला सुरूवात झाली असताना ‍अजिंक्य रहाणे मात्र सुट्टीवर आहे. 14 ऑक्टोबरला मुंबईचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. पण अजिंक्य रहाणेने या सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे मुंबईच्या निवड समितीला कळवले आहे. अजिंक्याच्या या निर्णयामुळे निवड समिती नाराज झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.