कोरोनातही बीसीसीआय मालामाल

नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (13:56 IST)
भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईत केले. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात झालेल्या या स्पर्धेच्या आयोजनातून बीसीसीआयही मालामाल झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बीसीसीआयने तब्बल 4 हजार कोटी रूपयांची कमाई केली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. कमाईच्या बाबतीतच्या बीसीसीआय
मालामाल झाले नसून गेल्या हंगामाच्या तुलनेत आयपीएलचे सामने टीव्हीवर पाहणार्या प्रेक्षकसंख्येतही 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

धुमाळ यांनी बीसीसीआयने कमावलेल्या 4 हजार कोटींचे वर्गीकरण करुन सांगायला नकार दिला. दुबई, अबुधाबी आणि शारजा या तीन मैदानांवर आयपीएलचे सामने रंगले. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अनेकांनी आम्हाला आयपीएलचे आयोजन करु नका असा सल्ला दिला. आमच्यातही थोडे संभ्राचे वातावरण होते. खेळाडूंना काही झाले तर काय करायचे ही भीतीमनात होती. परंतु जय शहा हे ठाम होते आणि स्पर्धा यशस्वीरीच्या पार पडली जाईल असा त्यांना विश्वास होता.
मेल आयपीएल हंगामाच्या तुलनेत बोर्डाने आपले खर्च 35 टक्क्यांनी कमी केले. या
काळातही आम्ही 4 हजार कोटींची कमाई केली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीच्या सामन्याला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. जे सुरुवातीला आमच्यावर शंका घेत होते, त्यांनी नंतर येऊन आमचे आभार मानले. यंदाची स्पर्धा झाली नसती तर क्रिकेटपटूंनी एक वर्ष गमावले असते असेही धुमाळ म्हणाले.
यूएई व श्रीलंका अशा दोन क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला आयपीएल आयोजिण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु याआधी यूएईने आयपीएलच्या
काही सामन्यांचे आयोजन केले होते. ज्यामुळे बीसीसीआयने यूएईला पसंती दिली. खेळाडूंच्या सुरक्षिततेपासून ते जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यापर्यंत बीसीसीआयच्या अधिकार्यांनी सातत्याने फोन, व्हर्चुअल मिटिंग करत या सर्व गोष्टी जुळवून आणल्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व बाबतीत मदत केलेल्या यूएई क्रिकेट बोर्डाचेही धुमाळ यांनी आभार मानले.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. ...

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या ...

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पांड्या यांनी आज सकाळी ...

BANvWI: बांगलादेश पोहोचल्यावर वॉल्श झाला कोविड -19 ...

BANvWI: बांगलादेश पोहोचल्यावर वॉल्श झाला कोविड -19 पॉझिटिव्ह, ODI मालिकेतून बाहेर
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि दोन सामन्यांच्या कसोटी ...

भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना : असा आहे ब्रिस्बेनचा ...

भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना : असा आहे ब्रिस्बेनचा इतिहास
भारतऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर ...

टीम इंडिया आणि सिराजची वॉर्नरने मागितली माफी

टीम इंडिया आणि सिराजची वॉर्नरने मागितली माफी
सिडनीमध्ये झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताचे मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना ...