शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मे 2018 (10:56 IST)

जाडेजाच्या पत्नी रीवाबाला पोलिसांकडून मारहाण

जामनगर गुजरात येथे मोठी घटना घडली आहे. क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या पत्नीला मारहाण करण्यात आली आहे. रीवाबाच्या कारची पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. त्या वादातून पोलिसाने सर्वांसमोर भररस्त्यात तिला  मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. संजय अहिर असं आरोपी पोलिसाचं नाव आहे. पोलीस मुख्यालयाजवळील घटनेचा व्हिडीओ पुरावा म्हणून   दिसत आहे. तर  मारहाणीचा हा प्रकार पोलीस मुख्यालयाजवळच घडला आहे. व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला रीवाबा आणि पोलीसामध्ये वाद सुरु असल्याचं दिसत असून, याप्रकरणी कॉन्स्टेबल संजय अहिरला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत की हा पोलीस गाडीवर असतांना त्याच्या गाडीला धक्का लागल मात्र कोणतेही कारण न विचारता या पोलिसाने उतरून गाडीतील महिलांना मारहाण केली आहे. पोलिसांना इतका माज असावा का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.