मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (10:49 IST)

INDW vs AUSW:स्मृती मंधानाने शतक झळकावून इतिहास रचला,ही कामगिरी करणारी भारताची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे/नाईट कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला आहे. पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी ती भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू आहे. 
 
भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे/नाईट कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला आहे. दिवस/रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारी ती भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारी ती भारताची पहिली खेळाडू आहे. मंधानाचे हे पहिले कसोटी शतक आहे.