testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जयदेव उनाडकट आयपीएलचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला

बंगळुरू| Last Modified सोमवार, 29 जानेवारी 2018 (11:00 IST)
पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये रिकाम्या हाती परतलेल्या ख्रिस गेलवर अखेरच्या फेरीत प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने लावलेली बोली आणि जयदेव उनाडकटला मिळालेली 11 कोटी 50 लाखांची रक्कम हे आयपीएलच्या दुसर्‍या दिवशीच्या लिलावाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
सलग दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या, तर अनेकांच्या पदरी निराशा पडली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वाधिक बोली लागलेले दोन्ही खेळाडू हे राजस्थान रॉयल्स संघाकडेच आलेले आहेत. बेन स्टोक्स 12 कोटींपेक्षा जास्त रकमेसह तर जयदेव उनाडकट 11 कोटी 50 लाखांसह राजस्थानच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मनीष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेव उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 11 कोटी 50 लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करून घेतलेले आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघ मालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रित न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
संघ मालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. गौथ कृष्णाप्पा हा खेळाडू 6 कोटी 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर, मोहित शर्मा, संदीप शर्मा, मोहम्द सिराज या खेळाडूंनाही चांगल्या रकमेच्या बोली लागल्या. मात्र दुसर्‍या सत्रानंतर सर्व संघ मालकांनी स्थानिक खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीवर खरेदी करण्याचा सपाटा लावला. यात किंग्ज इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी बाजी मारली. मुंबई इंडियन्सनेही काही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

भारताची ऐतिहासिक कामगिरी : ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; ...

national news
भारताने मेलबर्न एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिका ...

तो' एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकला

national news
‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच ...

बर्‍याच महिलांशी संबंध असलेल्या वक्तव्यावर अडकले पंड्या, ...

national news
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने बुधवारी ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि ओपनर के. ...

टीम इंडियाला बोनस जाहीर

national news
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय मिळवत ७१ वर्षांमध्ये ...

सिडनी टेस्ट ड्रॉ : टीम इंडियाने 70 वर्षांनंतर रचला नवीन ...

national news
आशियाई देशांनी कांगारूंच्या देशात एकूण 98 सामने खेळले आणि त्यापैकी केवळ 11 मध्ये विजय ...