मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ शॉवर घेऊ नका, खेळाडूंना सूचना

In dry Cape Town
दक्षिण आफ्रिकेत दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून त्याची झळ आता केपटाऊनमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंनाही सहन करावी लागत आहे. आंघोळीच्यावेळी दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ शॉवर घेऊ नये, असे भारतीय खेळाडूंना हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

केपटाऊनमधील पाणी टंचाईमुळे हॉटेल प्रशासनाने पाणी वाचवण्यासाठी काही नियम जारी केले आहेत. हे नियम अगदीच बंधनकारक नसले तरी हॉटेल प्रशासन त्यासाठी आग्रही आहे. सराव केल्यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा हॉटेलवर परतले तेव्हा त्यांना याबद्दल सांगण्यात आले. आता  केपटाऊनमधील या समस्येशी भारतीय खेळाडू जळवून घेत आहेत.