testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आयसीसीच्या क्रमवारीत पुजारा तिसऱ्या स्थानावर

दुबई| Last Modified बुधवार, 20 डिसेंबर 2017 (09:10 IST)
आयसीसीच्या कसोटी विश्‍वक्रमवारीतील फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्‍वर पुजाराने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 54 कसोटी सामन्यांत 52.96 सरासरीने 4396 धावा करणाऱ्या पुजाराने 873 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली 893 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून 945 गुणांसह अग्रस्थानी असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याची सर डॉन ब्रॅडमन यांच्या 961 गुणांच्या विक्रमाकडे सुरू असलेली घोडदौड कायम आहे. सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत स्मिथने ब्रॅडमनना कधीच मागे टाकले आहे. आपल्या कारकिर्दीत 114 कसोटी खेळणारा स्मिथ सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत सर गॅरी सोबर्स (189 कसोटी), व्हिव्ह रिचर्डस (179), ब्रायन लारा (140) आणि सचिन तेंडुलकर (139) यांच्यानंतर पाचव्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा व आर. अश्‍विन तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर कायम असून इंग्लंडचा जेम्स अँडरसन 892 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजा (870) व अश्‍विन (829) अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. सांघिक क्रमवारीत भारत 124 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम असून दक्षिण आफ्रिका (111), इंग्लंड (105), न्यूझीलंड (100) आणि ऑस्ट्रेलिया (97) त्याखालोखाल पहिल्या पाचात आहेत.


यावर अधिक वाचा :

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु ...

national news
राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक ...

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

national news
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

national news
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार ...

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

national news
इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे ...