बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

गब्बरला आयसीसी चे नियम माहीत नव्हते!

आपल्या तडाखेडबंद फलंदाजीने धावांचे शिखर रचणारा गब्बर अर्थातच शिखर धवनबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिखरला टी-20 चा पहिला सामना खेळताना आयसीसीचे नियम माहीत नव्हते. ही बाब स्वत: शिखर धवनेही मान्य केली आहे.
 
आयसीसीने अलीकडेच क्रिकेट नियमांमध्ये काहीसे बदल केले आहेत. नुकत्याच झालेल्या भारत- ऑस्ट्रेलिया एकदिवशीय सामन्यांमध्ये हे नियम लागू नव्हते. पण त्यानंतर सुरू झालेल्या टी-20 पासून ‍हे नियम लागू करण्यात आले. आयआयसीने कोणत्याही नियमांमध्ये बदल केले की त्याची माहिती खेळाडूंना दिली जाते. खेळाडूंनीही नव्या नियमांबाबत जाणून घेणे अपेक्षित असते. पण गंमत अशी की भारताचा तडाखेबंद फलंदाज शिखर धवनच्या बाबतीत काहीसे भलतेच घडले.
 
शिखर धवनला नियम बदलल्यावर झालेल्या टी-20 च्या पहिल्या सामन्यात त्याची कल्पना नव्हती. एका पत्रकार परिषदेत स्वत: शिखर धवनेही ही बाब स्वीकारली आहे.