testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मित्रांसाठी कुक बनला सचिन

सचिन तेंडुलकर जसा क्रिकेटमध्ये तसाच अस्सल खवय्याही आहे. क्रिकेटच्या मैदानावर दमदार बॅटिंग करणारा सचिन खाण्याच्या टेबलावरही तितकीच जोरदार खव्य्येगिरी करतो.
थर्टीफर्स्टच्या पार्टीचा एक व्हिडिओ त्याने ट्विटरवर पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होत आहे. न्यू इयर इव्हला त्याने मित्रांसाठी बार्बेक्यूचा बेत आखला आणि स्वत: शेफ होऊन सचिनने चिकन बनवले. हे चिकन त्याने आपल्या मित्रांना खाऊ घातले.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मित्रांसाठी जेवण बनवताना मला फार आनंद झाला. त्यांने ते जेवण फार आवडले असून त्यांच्या जीभेवर अजूनही बार्बेक्यूची चव रेंगाळत आहे असे म्हणत सचिनने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.


यावर अधिक वाचा :