1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 13 एप्रिल 2022 (23:58 IST)

Pakistan Cricket Board: इम्रान खाननंतर आता रमीझ राजा पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात

पाकिस्तानमधील राजकीय पेचप्रसंगात एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना हटवल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा राजीनामा देऊ शकतात. रमीझ आणि इम्रान यांचे चांगले संबंध होते. इम्रान खान यांच्या सांगण्यावरून रमीझ राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख बनल्याचे मानले जाते.
 
इम्रान खान प्रमाणेच रमीझ राजा देखील पाकिस्तानचे माजी कर्णधार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रमीझ सध्या दुबईत आहे. एका सूत्रानुसार,"रमीझ राजाने केवळ इम्रान खानच्या सांगण्यावरून पीसीबीचे अध्यक्ष होण्यास सहमती दर्शवली. इम्रानच्या नेतृत्वाखाली खेळणारे सर्व खेळाडू त्याचा आदर करतात. रमीझ देखील त्यापैकीच एकआहे. 
 
रमीझने इम्रान खानला आधीच सांगितले होते - जोपर्यंत तुम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान आहात तोपर्यंत मी बोर्डाचा अध्यक्ष असेन.ते  निवड प्रक्रियेसाठी अध्यक्षाची नियुक्ती करतात. आता रमीझ राजा बोर्डाच्या अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता नाही. नव्या पंतप्रधानांनी त्यांना या पदावर कायम राहण्यास सांगितले तर प्रकरण वेगळे असेल. रमीझ राजा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पीसीबीचे 35 वे अध्यक्ष झाले.