मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , बुधवार, 16 मे 2018 (12:03 IST)

आयसीसी अध्यक्षपदी पुन्हा शशांक मनोहर

आयसीसीच्या अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. 2016 साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती, यानंतर अध्यक्षपदाची मनोहर यांची ही दुसरी टर्म असणार आहे.
 
आयसीसीच्या अध्यक्षपदी फेरनिवड होणे हा माझ्यासाठी एकप्रकारे सन्मान आहे. माझ्या नावाला पाठिंबा देणार्‍या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. 2016 साली जी आश्वासने मी दिली होती, ती पूर्ण करण्यात काही अंशी यश आले आहे.
 
आगामी वर्षांमध्ये ही आश्वासने पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. फेरनिवडीनंतर शशांक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आयसीसीच्या धोरणांमधून क्रिकेटचा प्रसार जगभर व्हावा हाच आपला प्रयत्न असल्याचे मनोहर यावेळी म्हणाले.