1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (15:17 IST)

'रावळपिंडी एक्स्प्रेस' शोएब अख्तर पुन्हा मैदानात येणार

'रावळपिंडी एक्स्प्रेस' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानी संघातील माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धेतून तो पुनरागन करणार आहे.
 
मीसुद्धा यावेळी लीग खेळायला येतोय, असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. आजकालच्या मुलांना (खेळाडूंना) वाटते की त्यांना खूप काही येते. त्यांना असेही वाटते की, ते माझ्या वेगाला आव्हान देऊ शकतात. खरा वेग काय आहे हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. त्यासाठीच मी लीग (पीएसएल) खेळणार आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा, अशी सूचनाच शोएब अख्तरने दिली आहे.
 
एकेकाळी शोएब अख्तर जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होता. 161 कि.मी./ प्रति तासच्या वेगाने तो गोलंदाजी करत असे. त्याची गोलंदाजी खेळताना भल्याभल्या फलंदाजांना चाचपडावे लागले. 
 
शोएब 46 कसोटी,163 वनडे आणि 15 टी-20 सामने खेळला आहे. कसोटीत 178, वन-डेत 247 तर टी-20मध्ये 19 विकेट त्याच्या नावावर आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने समालोचन करण्यास सुरुवात केली. आता मात्र तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागन करणार आहे.