testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘जायफळा’चे विविध उपयोग…

jaiphal nutmeg nut
जायफळ चहा, कॉफी, दुधात व मिठाईत स्वादासाठी वापरतात हे सर्वश्रुत आहे; पण याचा औषधीतदेखील मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मोठे वजनदार, टणक जायफळ उत्तम प्रतीचे असते. जायफळ अनेक वर्षे तुपात ठेवले असता खराब होत नाही. जायफळापासून तेल निघते. या स्थिर तेलास ‘जातिफळ-नवनीत’म्हणतात.

जायफळ कफवातशामक, शोथहर, वेदनास्थापन, उत्तेजक, कुष्ठघ्न, दुर्गंधीनाशक व वातशामक आहे.
जायपत्रीपासून बनविलेल्या तेलात “जावंत्रिका तेल’ (बांडा साबू) म्हणतात. बाजारात याच्या साबणासारख्या वड्या मिळतात.
झोपताना तुपात उगाळलेल्या जायफळाचा लेप मस्तकावर करण्याने शांत झोप लागते.
डोकेदुखीत दुधात उगाळून मस्तकावर लेप करावा.
पोटदुखी, मोडशी, जुलाबात भाजलेल्या जायफळाची पूड, दूध वा पाण्यातून कैफ येईल इतक्‍याच प्रमाणात घ्यावी.
डोकेदुखी तसेच बाळंतपणातील कंबरदुखीत पाण्यात अगर दारूत उगाळून लेप करतात.
तुपात उगाळलेल्या 1 ग्रॅम जायफळाचे लेपात 2 थेंब मध व 2 चिमटी खडीसाखरपूड घालून दिवसातून तीन वेळा घेण्याने पांढरी आव, अतिसारास आराम पडतो.
जायफळ भाजून तितकाच गूळ घालून 1/1 ग्रॅमच्या गोळ्या बनवून दर 10 मिनिटांनी 1/1 गोळी जुलाब थांबेपर्यंत घेत जावी. फार लवकर आराम पडतो.
जायफळ तांदळाच्या धुवणात उगाळून घेण्याने उचकी थांबते.
राईच्या तेलात जायफळाचे तेल मिसळून मालीश करण्याने बरेच दिवसाचे जखडलेले सांधे मोकळे होतात.
कामोत्तेजना, स्तम्भन, रजोरोध आदी विकारात हितकर.
अतिसारात जायफळ उगाळून बेंबीवर लेप करतात.
चर्मरोगावर जखम लवकर सुकण्यासाठी पाण्यात उगाळून लेप करावा.
पाव जायफळाचे चूर्ण कोमट पाण्यातून घेण्याने चांगली झोप लागते.
व्रण भरून येण्यासाठी वस्त्रगाळ चूर्णांचे तिळाचे तेलात खलून केलेले मलम वापरतात.
कापसाच्या बोळ्यात पूड घालून दाताखाली धरण्याने दातातील कीड मरते व ठणका थांबतो.
मोठ्या प्रमाणावर घेणे मादक असते


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

चिकन सींक : मायक्रोवेव्ह स्पेशल

national news
एका भांड्यात टोमॅटो व चिली सॉस, सिरका, अंडा, मीठ व काळे मिरे आणि कॉर्नफ्लोर टाकून फेटून ...

आहारातूनच मिळवू शकता औषधं

national news
आजच्या काळात वाढणार्‍या आजाराचं मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार क्षमतेचा अभाव. आपण ...

ताप आल्यावर कपाळावर पट्ट्या ठेवाव्या की नाही?

national news
आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत की ताप जास्त असेल तर गार पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्या. ...

एसीत झोपण्याने लठ्ठपणा वाढतो, हे माहित आहे का?

national news
* फुल स्पीड पंख्यात किंवा एसीमध्ये झोपण्याने लठ्ठपणा वाढतो. * उभ्या उभ्या पाणी ...

स्पायकरचे उन्हाळ्यातील ट्रेंडी पेस्टल कपडे

national news
हिवाळा हळू हळू कमी होत असून उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे आता ...