मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 11 जुलै 2018 (12:25 IST)

धोनीचा असा आहे विचार, म्हणून ट्रॉफी जास्त वेळ हातात ठेवत नाही

टीम इंडिया माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी विजयानंतर मिळालेली ट्रॉफी तो कधीच जास्त वेळ आपल्या हातात ठेवत नाही. ट्रॉफी हातात येताच तो ती इतर खेळाडूंच्या हातात देऊन टाकतो. एका इंटरव्यूमध्ये धोनीने म्हटलं की, सगळ्यात मोठं आव्हान काही खेळाडूंचा अहम न दुखवता त्यांचा कॉमन सेंस विकसित करण्याचं होतं. 
 
आता एक असा ट्रेंड झाला आहे की, धोनी येतो आणि ट्रॉफी घेताच ती दुसऱ्या खेळाडूंच्या हातात देऊन कोपऱ्याला निघून जातो. असं का? हा प्रश्न विचारल्यानंतर धोनीने म्हटलं की, तुम्हाला नाही वाटत का की मॅच तर संपूर्ण टीम जिंकते आणि ट्रॉफी फक्त कर्णधार हातात घेतो. हा एक प्रकारचा ओवर एक्पोजर असतो. तुम्हाला हा एक्पोजर आधीच भेटलेला असतो. जवऴपास 15 सेकेंडचा... त्यानंतर मला नाही वाटत की, तुमची तेथे गरज असते. सगळ्याना सेलिब्रेशन करणं आवडतं. तुम्ही त्याचा भाग आहात आणि असं नाही की तुम्हाला त्या ट्रॉफीसोबतच राहायचं आहे. यामुळे मी म्हणतो की, जेवढं शक्य आहे तेवढी गोष्ट सरळ करण्याचा प्रयत्न असतो अस त्याने सांगितल.