गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2019 (15:09 IST)

सोने आणि हिरे जडलेली घड्याळ घालतो हार्दिक पंड्या, किंमत एकूण व्हाल हैराण

भारतीय संघाचा अद्भुत खेळाडू हार्दिक पंड्या ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 चेंडूत बनवलेल्या 48 धावांमुळे बराच चर्चेत आहे. पण आजकाल हार्दिक त्याच्या महागड्या शौकामुळे देखील खूप चर्चेत आला आहे. हार्दिकचे लक्झरी ब्रँड प्रति आकर्षण कोणा पासूनही लपलेलं नाही, यामुळे त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
1 लाख रुपयांची लुई व्हिटनची शर्ट असो किंवा 85,000 रुपयांची व्हर्साचे पांढर्‍या लेदरचे मेडुसा स्नीकर्स, हार्दिक आपल्या धमाल ड्रेसिंगमुळे सतत बातम्यांमध्ये जागा मिळवतो. अलीकडे हार्दिक आपल्या महागड्या घड्याळीमुळे चर्चेत आहे. यावेळी IPL मध्ये Mumbai Indians विजेता बनली आणि विजेता ट्रॉफीसह हार्दिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहे आणि सर्वांच लक्ष ज्याकडे आकर्षित होत आहे, ती आहे त्याची घड्याळ आणि त्याची किंमत एकूण आपण धक्काच बसेल.  
 
हार्दिकच्या मनगटावर पांढरी सोनं आणि हिरे सेट असलेली पाटेक फिलिप नॉटिलस ब्रँडची घड्याळ दिसत आहे. त्याची किंमत आपल्याला हैराण करेल. हार्दिकच्या हातातील घड्याळीची किंमत 3 कोटी रुपये आहेत. तथापि हे पहिल्यांदाच नाही आहे की हार्दिकाने महागडी घड्याळ घातली आहे. तो अशा महागड्या घड्याळी घालायचा शौक ठेवतो आणि म्हणूनच सतत अशा घड्याळी घालत असतो. आणि हेच कारण आहे की सोशल मीडियावर त्याचे फोटो अधिक चर्चेत राहतात.