1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रांची , शनिवार, 23 मे 2015 (10:56 IST)

चेन्नई अंतिम फेरीत दाखल

आयपीएल-8च्या दुसर्‍या क्वॉलिफायर सामन्यात बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 139 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने 19.5 षटकातमध्ये 7 विकेट गमावत 140 धावा करून सामना जिंकला. बंगळुरूचा तीन गडी राखून पराभव केला. आता रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नईमध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. 
 
चेन्नई संघाच्या हसीने सर्वाधिक 56 धावा केल्या. तर कर्णधार धोनी 26 धावा करुन 3 चेंडू शिल्लक असताना तंबूत परतला. अश्विनने शेवटी एक धाव काढून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. बंगळुरूने 20 षटकात 8 बाद 139 धावा काढल्या. बंगळुरूची सुरुवात खराब झाली. ख्रिस गेल व विराट कोहलीने 23 धावा काढल्यानंतर डावखुरा आशिष नेहराने कोहलीला बाद केले. कोहलीचा झेल मोहित शर्मा ने घेतला.