1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2015 (17:02 IST)

चेन्नई सुपरकिंग्ज- दिल्ली डेअरडेव्हिल्स लढणार

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने यंदा नव्याने संघाची बांधणी केली असली तरी चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या आधीच्या खेळाडूंवर विश्‍वास टाकला आहे. मायकेल हस्सी हा ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू संघात परतला आहे. त्यामुळे ड्वेन स्मिथ आणि त्याच्यामध्ये एक सलामीला येईल. विश्‍वचषक स्पध्रेत फटकेबाजी आणि आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर न्यूझीलंडला प्रथमच विश्‍वचषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत नेणारा ब्रेण्डन मॅक्कुलमवर त्यांची मदार असेल. फॅफ डू प्लेसिस मधल्या फळीत तर अखेरच्या षटकात ड्वेन ब्राव्हो फटकेबाजी करू शकेल. यंदा या संघाने इरफान पठाणला खरेदी केल्याने मोहित शर्मा, ईश्‍वर पांडेला तो योग्य साथ करू शकेल. भारतीय संघातील दोन फिरकी गोलंदाज आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा हे धोनीचे गोलंदाजीतील प्रमुख आधारस्तंभ असतील. याखेरीज पवन नेगी आणि राहुल शर्मा हे इतर फिरकी गोलंदाज या संघात आहेत. डावखुरा फटकेबाज सुरेश रैना तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करेल. 
 
दिल्ली डेअरडेव्हिल्सने यंदा युवराज सिंग आणि झहीर खानला संघात स्थान दिले आहे. विश्‍वचषक स्पध्रेसाठी निवड न झाल्यामुळे नाराज असलेल्या युवराज सिंगला आपली गुणवत्ता दाखवण्याची सुरेख संधी आहे. तेज गोलंदाज झहीर खानचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव संघाला लाभदायक ठरू शकेल. टीम इंडियातील महम्मद शमी विश्‍वचषक स्पध्रेतील आपली झकास कामगिरी आयपीएलमध्येही कायम ठेवण्याची शक्यता आहे. या संघाने अमित मिश्राला यंदा संधी दिली आहे. तो आपल्या फिरकीचा प्रताप दाखवण्याची शक्यता आहे. याशिवाय विश्‍वचषक स्पध्रेत आपली छाप पाडणारा दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर या संघात आहे.
 
चेन्नई सुपर किंग्ज संघ
 
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मायकेल हस्सी, ड्वेन स्मिथ, फॅफ डू प्लेसिस, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, इरफान पठाण, रवींद्र जडेजा, मिथुन मनहास, पवन नेगी, आर. अश्‍विन, मोहित शर्मा, ईश्‍वर पांडे, मॅट हेन्री, राहुल शर्मा, आशिष नेहरा, सॅम्युएल बद्री, केल अँबॉट, प्रत्युभ सिंग, अंकुश बैस, रोहित मोरे, बाबा अपराजिथ, एकलव्य द्विवेदी.
 
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ 
 
जिन पॉल ड्युमिनी (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मयांक अगरवाल, मनोज तिवारी, युवराज सिंग, सौरभ तिवारी, एंजेलो मॅथ्युज, इम्रान ताहिर, केदार जाधव, अमित मिश्रा, शाहबाज नदिम, झहीर खान, जयदेव उनदकत, महम्मद शमी, गुरिंदर संधू, सी. एम. गौतम, अल्बी मॉर्केल.?चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन वेळा विजेता आणि दोन वेळा उपविजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जची पहिली सलामी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाशी असेल. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आयपीएलमध्ये किंग ठरला आहे. त्यांच्याच एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर यजमानांना पराभूत करणे दिल्ली डेअरडेव्हिलसपुढे एक आव्हानच असेल.