testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हिर्‍यांचे लिप आर्ट

diamond lip art
हरणासारखे टपोरे डोळे, चाफेकळी नाक आणि नाजूक जीवणी हे स्त्रीसौंदर्याचे लक्षण आहे. त्याची आता कृत्रिम पद्धतीनेही शोभ वाढवली जाते. अनेक मेकअप आर्टिस्ट भन्नाट कल्पना अमलात आणत असतात. आता तर ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी चक्क हिर्‍यांचाही वापर करण्यात आला आहे. व्लाडा नामक महिला लिप डिझायनर म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या युक्त्या वापरुन ओठ सजवण्यासाठी ती ओळखली जाते. व्लाडाने एका मॉडेलच्या ओठांवर चक्क हिर्‍यांचे लिप आर्ट केले आहे.
ओठांना सजवण्यासाठी व्लाडाने निरनिराळ्या आकाराचे 80 हिरे वापरले आहेत. या हिर्‍यांची किंमत 17 लाख 22 हजार इतकी आहे. तिने तयार केलेल्या हा हिरेजडीत लिपलूक जगातला सगळ्यात महागडा लिपलूक ठरला आहे. व्लाडाने ओठ सजवण्यासाठी आजवर असे अनेक प्रयोग केले आहेत.


यावर अधिक वाचा :