testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हत्तीला पान खाण्याचा शौक

elephant
चंदीगड- पानाचा विडा खाणे कुणाला आवडत नाही? देवदेवतांनाही नैवेद्याबरोबर तांबुल अर्पण करण्याची प्रथा आहे. मुखशुद्धीसाठी खाल्ला जाणार्‍या पानाच्या विड्याने आपल्या देशातील अनेक चौक, सार्वजनिक इमारतींच्या भिंती, स्वच्छतागृहे यांची अशुद्धी झाली आहे ती गोष्ट वेगीळी.
मध्य प्रदेशातील एका हत्तीलाही अशीच पान खाण्याची सवय लागली आहे. देशात रोज दारू पिणारा रेडा, सफरचंद खाणारी म्हैस जशी आहे तसाच हा पान खाणार हत्ती आहे. येथील हा गजराज रोज एका पान टपरीवर जाऊन येथील दुकानदाराकडून पानाचा विडा घेतो. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी लोक पान टपरीजवळ गर्दी करतात.

जोपर्यंत हा दुकानदार त्याला पान देत नाही तोपर्यंत हत्ती तेथून हलत नाही. माहुताने कितीही आटापिटा केला तरी हत्तीवर परिणाम होत नाही. तो शांतपणे अन्य गिर्‍हाईकांचे पान खरेदी करणे होईपर्यंत वाट पाहत उभा राहतो.
त्याच्या सोंडेत पान ठेवताच तो घूम जाव करतो हे विशेष. या हत्तीला कशा प्रकारचे पान आवडते हे दुकानदारलाही ठावूक आहे. त्यामुळे रोज तो त्या पद्धतीने पान बनवून त्याला खायला घालतो.


यावर अधिक वाचा :