गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (11:15 IST)

इंटरनेट

सध्याच्या काळात सर्वात मोठा आविष्कार म्हणजे इंटरनेट आहे. याचा माध्यमाने सर्व लोक संगणक किंवा मोबाईलच्या माध्यमाने एकमेकांशी जोडले गेले आहे. या साठी मोडेमची गरज असते. इंटरनेटच्या मदतीने लोक कोणतीही फाइल, फोटो आणि आवश्यक दस्तऐवज देखील एका जागे पासून दुसऱ्या जागी पाठवू शकतात किंवा मोबाईलने एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत कोणतीही माहिती पाठवू शकतात. याचा माध्यमाने लोक आपली गोष्ट जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या लोकांपर्यंत पसरवू शकतात.
 
आजच्या काळात इंटरनेट इतके महत्त्वाचे साधन आहे की ह्याचा शिवाय जगणं अशक्यच झाले आहे. ह्याचा एक फायदा असा आहे की लोक घरातच बसून सर्व माहिती मिळवू शकतात. आज इंटरनेट शाळेत, ऑफिसात, कॉलेजात, रुग्णालयात, रेल्वे स्थानकात, शोध कार्यासाठी, बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. 
 
आपण घरातच बसून रेल्वेची, बसची, विमानाची, तिकिटे बुक करा शकता. तसेच शाळेच्या प्रकल्पासाठी मुलांना हे खूप महत्त्वाचे आहे. कुटुंबापासून दूर राहणारे नातेवाईक किंवा सदस्य देखील या मुळे जवळ आलेली वाटतात. कुठल्या ही ठिकाणी जाण्याचा प्रोग्रॅम देखील बनवू शकतो. इंटरनेटच्या माध्यमाने आपण आपल्यासाठी नोकरी शोधू शकतो. नवं घर देखील घरी बसल्या शोधू शकतो. इतकेच नव्हे तर आपला जोडीदार देखील याच्या वर शोधता येतो. 
 
या इंटरनेट चे जसे फायदे आहे तसे तोटे देखील आहे. लोक याचा गैर वापर करतात. तासंतास हे वापरतात. चांगल्या माहिती शिवाय नको ती माहिती मिळवून गैर वर्तन करतात. मुलं देखील अभ्यास सोडून तासंतास ह्याच्या वर गेम खेळतात. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर तसेच डोळ्यांवर देखील परिणाम होतो. कधी कधी या वर दिलेली माहिती खरीच असेल असे नसतं. काही लोक याच्या वरून लोकांची फसवणूक देखील करतात. पैशे लुबाडतात. या साठी योग्य असा सायबर कायदा असावा. म्हणून सावधगिरीने इंटरनेट हाताळावे आणि योग्य कामासाठीच त्याचा वापर करावे. हे असं जाळ आहे ज्यामध्ये माणूस गुरफटच जातो.इंटरनेट आपला वेळ वाचविण्यासाठी विकसित केलेले आहे. त्याला मर्यादेनेच वापरावे. आपण इंटरनेटचे गुलाम होण्यापेक्षा त्यालाच आपले गुलाम करून ठेवावे नाही तर ते आपल्यासाठी नुकसानदायी होऊ शकतं.