गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 14 मे 2018 (13:26 IST)

सहा-सहा महिने झोपून राहते ही तरुणी

रामायणातील कुंभकर्ण सगळ्यांनाच माहीत असेल. तो एकदा झोपला की सहा-सहा महिने उठतच नसे. ब्रिटनच्या मँचेस्टरध्ये राहणार्‍या बेथ गुडियर नावाच्या तरुणीची परिस्थितीही काहीशी अशीच आहे. आपल्या 17 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी बेथ सोप्यावर झोपली, ती झोपूनच राहिली.
 
तब्बल सहा महिने तिला जागच आली नाही. आता 22 वर्षांची झालेली बेथ खरे म्हणजे क्लाइन-लेविन सिंड्रोमची रुग्ण आहे. या आजारामध्ये रुग्ण एकदा झोपल्यानंतर महिनोंमहिने उठतच नाही. नोव्हेंबर 2011 ध्ये तिला हा आजार जडला.
 
सहा महिन्यांच्या झोपेत बेथ दिवसातले अवघे दोन तासच जागी होत असे. त्यावेळीही ती अर्धी झोपेतच असायची. आई जॅनिन सांगते की, गेल्या पाच वर्षांत बेथचा 75 टक्के वेळ झोपेत गेला आहे.
 
तिच्या जाग येण्याची व पुन्हा झोपी जाण्याची कोणतीच निश्चित अशी वेळ नाही. जाग आल्यावर ती फार फार तर दोन आठवडे जागी राहते. त्यानंतर कधीही व कुठेही झोपी जाते.