testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बेटिक आयआयटी-मुंबई यांच्यातर्फे ‘मेधा’ २०१९' या मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉनचे आयोजन

iit betic
Last Modified गुरूवार, 13 जून 2019 (11:26 IST)
वैद्यकीय गरजा भागविणाऱ्या कल्पक उपकरणांच्या नवनिर्मितीसाठी प्रेरणा देण्यासाठी आयआयटी मुंबईतील, बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी इनक्युबेशन सेंटर (‘बेटिक’), सीओई पुणे आणि व्हीएनआयटी नागपूरयांच्यातर्फे मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन अर्थात मेधा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने डॉक्टर आणि इंजिनीअर्स एका व्यासपीठावर एकत्र येऊन नावीन्यपूर्ण उपकरणांची निर्मिती करतात. २०१४सालापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचे व्हिडियो पाहतात आणि एकत्रितपणे काम करून उपाययोजनेची निर्मिती करतात.
प्रत्येक पथकात डॉक्टर्स, डिझायनर्स आणि इंजिनीअर्स (मेकॅनिकल वइलेक्ट्रॉनिक्स) यांचा समावेश आहे. ते विचारमंथन करून, आराखडे काढून प्रोटोटाईप्स तयार करतात. आघाडीच्या नवनिर्मात्यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रगत प्रशिक्षण व फेलोशिप प्राप्त करण्याची संधी मिळते.आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ‘मेधा'ची ८ पर्वे आयोजित करण्यात आली आहेत.
यंदा ‘बेटिक’, मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट ऑफ टेस्टिंग, रिसर्च अँड ट्रेनिंग, पुण्यातील व्हेंचर सेंटर आणि नागपूरमधील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या संस्थांमध्ये जुलैमधील शनिवार-रविवारी ‘मेधा’चेआयोजन करणार आहे.

"पूर्तता न झालेल्या गरजा मांडणारे डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक इंजिनीअर्स यांना ‘मेधा’ एकत्र आणते. ते निदान किंवा उपचारासाठी नवीन वैद्यकीय उपकरणांच्या ठोस संकल्पना तयार करतात. याकल्पनांवर ‘बेटिक’च्या विविध केंद्रांमध्ये पुढे काम होते किंवा उत्पादने विकसित करण्यास तसेच त्यात रस असलेल्या संस्था त्यांना स्टार्टअप कंपनीद्वारे बाजारात आणण्याचे किंवा परवाने घेऊन उद्योगात आणण्याचे काम करतात.गेल्या चार वर्षांत आमच्या टीम सदस्यांनी ५० पेटंट्स फाईल केली आणि त्यातील १२ संकल्पनांसाठी परवाने मिळाले आहे. या संकलप्ना स्टार्टअप्स किंवा प्रस्थापित उद्योगांच्या माध्यमातून वास्तवात येणार आहेत. यातील अनेककल्पनांचे उगमस्थान ‘मेधा’ होती,” असे ‘बेटिक’चे संस्थापक प्राध्यापक बी. रवी म्हणतात.

इच्छुक उमेदवारांना २५ जून २०१९पूर्वी ‘बेटिक’च्या वेबसाईटवर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना त्यांचा बायो-डेटा, सृजनात्मक कामाचा पोर्टफोलिओ अपलोड करावा लागेल. त्या आधारे त्यांना शॉर्टलिस्ट केलेजाईल, मुलाखती घेतल्या जातील आणि निवड होईल. निवडलेल्या उमेदवारांनी १००० रुपयांची नॉन-रिफंडेबल फी भरणे आवश्यक आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बजेटमध्ये बँकिंग, इंफ्रा आणि ऑटो सेक्टरला मिळू शकतो दिलासा!

national news
बजेटच्या तयारीत बँकिंग सेक्टर आणि कॅपिटल मार्केटच्या प्रतिनिधींनी वित्तमंत्र्यांसमोर ...

भारत-पाक सामन्या दरम्यान अम्मांचा व्हिडिओ व्हायरल

national news
रविवारी वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकला ...

मोदी सरकारचे बक्षीस! शेतकर्‍यांसाठी आणणार आहे कॅशबॅक स्कीम

national news
लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार बजेटमध्ये कॅशबॅक सारखी स्कीम आणू शकते. ...

फेसबुक लाईव्ह करताना अपघात, 2 भावांचा मृत्यू

national news
नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना झालेल्या अपघात 2 भावांचा मृत्यू ...

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

national news
पुण्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण झाली. पाच ...