testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

येथे चालते केवळ हावभावांची भाषा

समोरच्या व्यक्तीसोबत आपण बोलून संवाद साधतो. काहीवेळा हातवारे व इशारा करूनही आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवता येते. पण ते प्रत्येकावेळी शक्य होईल, असे नाही. इंडोनेशियातील बेंगकला नावाच्या एका गावामध्ये फक्त इशार्‍यांची भाषा बोलतात. तोंडी संवाद अगदी क्वचित प्रसंगी साधतात. मागील सात पिढ्यांपासून या गावातील लोक असेच करत आहेत. फक्त गावामध्ये राहणारेच नाही तर तिथल्या विविध कार्यालयांमध्येही अशाच प्रकारे हावभाव करूनच कामे केली जातात. असे सांगितले जाते की या सांकेतिक भाषेला काटा कोलाक असे म्हणतात.
या गावातील लोक डीफ व्हिलेज नावानेही ओळखले जातात. बेंगकला गाव आणि तिथली कार्यालये सर्वत्र हातवारे करूनच लोक एकमेकांसोबत संवाद साधत असल्याने बाहेरुन येणार्‍या लोकांच्या ते डोक्यात शिरत नाही. त्यामुळे अन्य गावांतून तिथे फार कमी लोक येतात. परिणामी स्थानिक लोकांनाच तिथली सगळी व्यवस्था सांभाळावी लागते. बेंगकला गावातील काटा कोलोक सांकेतिक भाषा शेकडो वर्षापूर्वीची आहे. या गावातील बहुतांश लोकांना बोलण्या व ऐकण्याची समस्या आहे. अन्य ठिकाणांपेक्षा ही समस्या या गावात 15 पटीने जास्त आहे. त्यामुळे या लोकांनी एकमेकांसोबत संपर्क साधण्यासाठी अशी इशार्‍याची भाषा विकसित केली आहे.
या गावातील अनेक मुले जन्मत:च ऐकण्या व बोलण्याच्या आजाराने ग्रस्त असतात. या समस्येसाठी तिथली भौगोलिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.


यावर अधिक वाचा :