testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

स्थलांतरित पक्षी व जीव

migratory-birds-arrive
Last Modified शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (11:48 IST)
गुलाबी थंडी सुरू झाली की पाणथळ प्रदेश, झाडेझुडपे, जंगल असलेल्या भागात विविध रंगीबेरंगी पाहुणे पाहाला मिळतात. या पाहुण्या पक्ष्यांना देश-विदेश, राज्य, प्रदेश यांची सीमा नसते. या काळात आपले नेहमीचे वास्तव्य सोडून हे पक्षी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये स्थलांतर करतात. जगभरात पक्ष्यांच्या स्थलांतराचा वेध घेण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत.
काही पक्ष्यांना बँड बांधून, रेडिओ कॉलर लावून स्थलांतराचा मार्ग शोधण्याते प्रयत्न केले जातात. जगभरातील अनेक संस्थांनी यासाठी अभ्यास प्रकल्प हाती घेतले आहेत. तरीही याबाबतचे कुतूहल पूर्ण शमलेले नाही. हे पक्षी त्यांचे अन्न कमी झाल्यावर ते जिथे मुबलक असेल तिथे स्थलांतर करतात. त्या-त्या परिसरातील बदलते हवामान, त्याल अतिकूलता सोसण्याची तयारी हे पक्ष्यांच्या स्थलांतराचे मुख्य कारण ठरते.
महाराष्ट्रात दरवर्षी येणार्‍या पाहुण्या फ्लेमिंगोचे म्हणजेच रोहित पक्ष्यांचे नेहमीच आकर्षण असते. काही वर्षांपूर्वी केवळ पक्षी मित्रापुरते हे आकर्षण सीमित होते. आता मात्र पूर्ण किनारपट्टीवर हजारोंच्या थव्यानी आलेले लालसर, करडे, गुलबट फ्लेमिंगो
बघण्यासाठी समुद्र सफरीही केल्या जातात. सैबेरियातून आलेले फ्लेमिंगो कच्छच्या

रणात पाणी आटल्यावर तेथून महाराष्ट्राच्या दिशेने जडण्यास सुरुवात करतात.

स्थलांतर फक्त अपृष्ठवंशीय प्राण्यामध्येच नव्हे तर मोठे जल सस्तन प्राणी जसे हम्पर्बेक डॉल्फिन आणि देवमाशामध्येही पाहायला मिळतात. अन्नाच्या शोधात वा प्रजननस्थळाच्या शोधा दरम्यान हे स्थलांतर करताना आढळतात. मुंबईतील जंगले, तलाव, बागा आणि किनारेसुद्धा हजारो मैल प्रवास करणार्‍या प्राण्यासाठी, समुद्री जीवासाठी नैसर्गिक अधिवास आहेत. प्रजनन काळात समुद्रकिनारी स्थलांतर करणारी ऑलिव्हरिडल ही समुद्री कासव आता दुर्मीळ झाली आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत.
म. अ. खाडिलकर


यावर अधिक वाचा :

मल्ल सुशिल कुमारचा धक्‍कादायक पराभव

national news
भारताचा आघाडीचा मल्ल सुशिल कुमारयाला आपल्याच पहिल्या सामन्यात बहरिनच्या अदाम ...

इंडोनेशियावर भारतीय महिला हॉकीसंघाचा विजय

national news
येथे सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेत महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा 8-0 असा सहज पराभव करत ...

आशियाई स्पर्धेत नेमबाजीत दीपक कुमारला रौप्य

national news
आशियाई स्पर्धेत दुसरा दिवस भारतीयांच्या दृष्टीने कभी ख़ुशी कभी गम या स्वरूपाचा राहिला. ...

काश्मीर आमचेच : पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्ष ठणकावले, ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना ठणकावले आहे. ...

भारतीय बँकांना तब्बल 28 हजार 500 कोटींचा तोटा

national news
जानेवारी ते डिसेंबर 2017 या काळात भारतीय बँकांना तब्बल 28 हजार 500 कोटींचा तोटा झाला आहे. ...

Xiaomi Mi A2 चा पहिल्यांदा देशात सेल सुरु

national news
देशात पहिल्यांदाच Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची विक्री सुरू होत आहे. दुपारी 12 वाजेपासून ...

Jio phone 2: दुपारी 12 वाजेपासून सुरू होत आहे फ्लॅश सेल, ...

national news
Jio Phone 2 ची फ्लॅश सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना याला विकत ...

गुगलची अॅपल फोन वापरणाऱ्यांवरही नजर

national news
गुगल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांवरच लक्ष ठेऊन नाहीय, तर अॅपलचे फोन वापरणाऱ्यांवरही नजर ...

व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येईल

national news
फेक न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंस्टट मेसेजिंग प्लेटफॉर्म व्हॉट्सअॅपने मोठे बदल करत आता ...

अनावश्यक कॉल्स रोखण्यासाठी ट्रायकडून नवे अॅप

national news
अनेक वेळा आपल्या मोबाईलवर कधीही अनावश्यक कॉल्स येतात.या त्रासदायक कॉल्सपासून सुटका होणार ...