बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (09:01 IST)

वर्ष 2018 : 12 महिने, 12 संकल्प

नवे वर्ष नवे संकल्प ही परंपरा अनावरात सुरू आहे. अशात आम्ही असे काही संकल्प सांगत आहोत ज्याने समाज आणि देशाचा उद्धार होऊ शकतो. चला बघा 12 महिन्याचे 12 संकल्प....
 
1. प्रथम सुख निरोगी काया : आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करा, ज्याने आपल्या मेहनतीची कमाई वाया जाऊ नये. दररोज व्यायाम, योग करावे आणि आपल्या नातेवाईक व मित्रांनाही यासाठी आग्रह धरावा.
  
2. सुरक्षा : रस्त्यावर चालताना आपल्या आणि दुसर्‍यांच्या सुरक्षेची काळजी घ्या. नेहमी हेल्मेट आणि सीट बेल्ट लावून गाडी चालवा. किती घाई असली तरी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाही हे ठरवा.
 
3. पर्यावरण : या वर्षी दिल्लीत प्रदूषणाची भयावह स्थिती पाहता इतर शहरांची हे हाल व्हायला नको म्हणून वृक्षारोपणाला प्राथमिकता देणार. तसेच रोजच्या प्रवासाकरिता सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा प्रयत्न करेन. 
 
4. स्वच्छता : आपल्या घराच्या जवळपास स्वच्छतेसह रस्त्यावर थुंकणार नाही, तसेच रस्त्यावर कचरा फेकणार नाही.
 
5. सोशल मीडियावर समजूतदारपणा : सोशल मीडियावर असे कोणतीही सामुग्री पोस्ट किंवा फॉरवर्ड करणार नाही ज्यामुळे अफवांना वाव मिळेल. फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याच्या सत्यतेची पुष्टी निश्चित करेन.
 
6. व्यक्तिगत संबंध : या वर्षी कुटुंब आणि ऑफिसमध्ये अनुशासन आणि खासगी संबंधांवर लक्ष देणार. वेळेवारी ऑफिस पोहचणार आणि वेळेवारी घरी जाऊन आपल्या कुटुंबाला वेळ देणार. शेवटी त्याच्या सुखासाठी आम्ही इतकी मेहनत घेतो. तसेच विशेष प्रसंगी आपल्या जवळीक मित्र आणि नातेवाइकांना स्वत: भेट द्याल.
 
7. रचनात्मकता : या वर्षी आपल्या रचनात्मकतेकडे लक्ष द्या. यासाठी आपल्या आवडीकडे लक्ष द्याल. जसे संगीत, ड्राइंग, पेंटिंग, स्विमिंग, योग इतर शिकणार.
 
8. शिक्षण : वर्षभर ईमानदारी आणि मन लावून अभ्यास करणार. वेळात वेळ काढून गरीब मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार.
 
9. जुन्या वस्तूंचे सदुपयोग : अशा वस्तू ज्या आता जुन्या झाल्या आहे किंवा कामात येणार नसतील त्यांचे सदुपयोग करू किंवा त्यांना गरजू व्यक्तींपर्यंत पोहचवू.

10. सामाजिक दायित्व : गरजू रुग्णांना रक्तदान करण्यासोबतच उपेक्षित वृद्धांसोबत काही वेळ घालवू. 

11. सामाजिक सौहार्द : असे कुठलेही काम करणार नाही ज्यामुळे सामाजिक समरसतेला नुकसान पोहोचेल तसेच या प्रकारचे  कामं करणार्‍यांना रोखण्याचा प्रयत्न कराल.

12. वाईट सवयी : दारू, सिगारेट आणि गुटखा सारख्या वाईट सवयी असतील तर त्यांना सोडायचा प्रयत्न करा.
... आणि शेवटी या गोष्टीचा प्रयत्न करू की हे संकल्प फक्त संकल्प नसून वास्तवात पूर्ण व्हायला पाहिजे.