Rajiv Gandhi Birth Anniversary राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान
Rajiv Gandhi भारतीय राजकारणात असे अनेक राजनेता होऊन गेले आहे जे त्यांनी केलेल्या त्यांच्या चांगल्या कार्यांमुळे नाहीतर त्यांच्यामुळे झालेल्या हानीमुळे लोकांच्या स्मृतीत अमर आहेत. पण जर आपण भारतीय राजकारणात एखाद्या सगळ्यात आश्चर्यकारक आणि अनपेक्षित प्रवेशाबद्दल बोलायला गेलो तर 'राजीव गांधी' हे नाव आपल्या लक्षात नक्कीच येईल.
भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून आपली छाप सोडणारे राजीव गांधी ह्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 मध्ये झाला होता. ह्यांची आई इंदिरा गांधी भारताच्या मुख्य राजकारणी होत्या आणि भारतीय राजकारणात आजपर्यंत झालेल्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. ह्यांचे वडील फिरोज गांधी एक सक्रिय राजकारणी, स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ता आणि पत्रकार होते.
ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज आणि लंडनचे इंपिरियल कॉलेज मध्ये डिग्री प्राप्त न करू शकण्याच्या प्रयत्नानंतर ते 1966 मध्ये भारत परतले आणि त्यांनी दिल्लीचे 'फ्लायिंग क्लब' येथे पायलटचे प्रशिक्षणत घेतले. व्यावसायिकप्रमाणे ते इंडियन एअरलाइन्सचे एक पायलट होते ज्यांना राजकारणात रुची न्वहती. आई इंदिरा गांधी यांची हत्या आणि भाऊ संजय गांधींचे विमान दुर्घटनेनंतर ह्यांना राजकारणात पाऊल ठेवावं लागलं. या प्रकारे ते भारताचे वयातील सर्वात लहान 6 वे पंतप्रधान झाले.
सक्रिय राजकीय कौटुंबिक संबंध असले तरी ते राजकारणात भाग घेण्यात कधीच उत्सुक नव्हते. राजकारणात ह्यांचा पाऊल ना केवळ अनपेक्षित होता पण भारताचे राजकारणीय घडामोडीला वेगळ्या मार्ग आणि इतिहास पण देणार होता.
तांत्रिक प्रगतीमध्ये योगदान
राजीव गांधी यांनी केलेल्या इतर कार्यांपैकी भारताच्या तांत्रिक क्षेत्रात सगळ्यात महत्वाचा योगदान आहे. त्यांनी दूरभाषेच्या विस्तार करण्याबद्दल कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात अत्याधुनिक दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि भारतीय दूरसंचार नेटवर्क आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट 1984 मध्ये 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स' (C-DOT) ची स्थापना करण्यात आली. सॅम पित्रोदा, ज्यांना भारतीय टेलिकॉमचे जनक म्हणून ओळखले जातं हे त्यांचे 'पब्लिक इन्फॉरमेशन इन्फ्रास्ट्रक्चर अँड इंनोव्हेशन' ह्याचे सल्लागार म्हणून होते. विज्ञानाच्या प्रयोगावर जोर देऊन त्यांनी कॉम्प्युटरचे अधिक वापर करण्यावर प्रोत्साहन दिला. कॉम्प्युटरच्या मदतीने रेल्वे तिकिट बुक होऊ लागण्यात यांचा मोठा योगदान होता. त्यांना "भारतातील सूचना तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांतीचे जनक" देखील म्हण्टलं जातं.
बोफोर्स कांड
80 - 90 व्या दशकात राजीव गांधी वर 'बोफोर्स आर्म प्रकरणात' लाच घेतल्याचा आरोप होता. त्यांच्यावर असा आरोप होता की भारतीय सैन्यसाठी स्वीडिश कंपनीकडून काही गन खरेदी केल्या गेल्या होत्या या करारामध्ये कोणतीही पारदर्शिता नव्हती. राजीव गांधी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले गेले आणि त्यांच्यावर पण लाच घेतल्याचा आणि व्यापार चालू ठेवल्याचा आरोप होता. असा म्हटलं जातं की ह्याच्याशी स्वतःला वाचवण्यासाठी 1988 मध्ये 'डेफॅमशन बिल' लोकसभेत प्रस्तावित केलं गेलं ज्याच्या हिशोबानी प्रसारमाध्यमांवर पुढे कोणतीही माहिती आणि बातम्या पोस्ट करण्यावर नियंत्रण लावलं गेलं आणि ह्याचा उल्लंघन करण्यावर "डेफॅमशन बिल" च्याखाली कार्यवाही करण्याचं जाहीर केलं गेलं.
राजीव गांधी हत्या आणि LITTE
त्यांनी केलेले इतर कार्यांपैकी आणि त्यांचबद्द्ल झालेल्या इतर घडामोडीमधून "LTTE" (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम ) च्या हा कांड त्यांना खूप भारी पडला. भारतीय शांतता दल (IPKF) श्रीलंकेत पाठवल्यामुळे आणि श्रीलंकन तमिळांवरील कथित IPKF च्या अत्याचारांमुळे राजीव गांधींबद्दल LTTE ह्यांच्या वैयक्तिक शत्रुतामुळे ही हत्या करण्यात आली. LTTE ला भीती होती की राजीव गांधी पुन्हा सत्तेवर आले तर ते LTTE नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्य पुन्हा श्रीलंकेत पाठवतील आणि "तामिळ इलम" हा वेगळा देश निर्माण होणार नाही. मानवी बॉम्बफेक करून त्यांची हत्या करण्यात आली. राजकीय विश्लेष्कांच्या मतानुसार त्यांनी श्रीलंकेच्या राजकारणात चुकीची पाऊल घेतला आणि कोणत्याही योजनाबद्दल विचार करण्याआधी भारतीय शांतता रक्षक दलांना श्रीलंकेत पाठवले.
राजकारण हे राजीव गांधींच्या मृत्यूचे कारण ठरले का ? राजीव यांना 1980 पर्यंत राजकारणात कोणताही पूर्व अनुभव किंवा रस नव्हता. राजीव गांधींची हत्याच्या इतर करणापैकी सगळ्यात मोठा त्यांचे अगदी लहान वयातच राजकारणात पडलेले पाऊल आणि तेही राजकारणाचा अनुभव न असताना तसेच मुत्सद्देगिरीचा अभाव हे त्यांच्या हत्येचे सर्वात मोठे कारण ठरले असावे.
- हर्षिता बारगल