शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोलापूर , शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:19 IST)

वेद हे वास्तुशास्त्राचे उगस्थान आहे

प्राचीन वेदांमध्ये स्थापत् वेद म्हणून उल्लेख आढळतो, म्हणजे वेद हे वास्तुशास्त्राचे उगम आहे, असे प्रतिपादन डॉ. रविराज अहिरराव यांनी केले.
 
मराठा समाजसेवा मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेत ' शिवकालीन पेशवेकालीन व आजचे वास्तुशास्त्र' या विषयावर शुक्रवारी दुसरे पुष्प गुंफताना डॉ. अहिरराव बोलत होते.
 
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करणत आले. विनायकराव पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर पाहुण्यांचा सत्कार सुभाष साळुंके यांनी केला.
 
पुढे बोलताना डॉ. अहिरराव म्हणाले की, वास्तुदोष सांगणारे लोक येतात आणि तोडफोड करण्यास सांगतात. त्यामुळे माणूस भांबावून जातो. ते लोकांना घाबरवून त्यांच्या असाह्यतेचा फायदा घेतात. वास्तुशास्त्र हे खूप प्राचिन शास्त्र आहे. विश्वकर्मा हा वास्तुशास्त्राचा जनक मानला जातो. मयासूर हा राक्षसांचा वास्तुशास्त्र मार्गदर्शक होता. वास्तूच्या मध्यभागी खड्डा किंवा पाणी आले तर गंभीर समस्या निर्माण होतात.
पेशवेकालीन शनिवारड्याच्या शोकांतिकेमध्ये वास्तुशास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे. वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जाते. प्रवेशद्वार उत्तर दिशेला समोर मोकळे पटांगण व नदी आहे. उत्तरेला पाणी असणे म्हणजे यश, समृद्धी, पैसा. अटकेपार झेंडे रोवले हा त्याचा परिणाम. पुढे पेशव्यांनी या वास्तूच्या मध्यभागी तळे निर्माण   केले, वास्तूच्या मध्यभागी खड्डा आणि पाणी आले त्यामुळे त्याला उतरती कळा लागली. नैऋत्य दिशेला भूयार खोदले त्यामुळे वास्तूदोष निर्माण होऊन पेशवाई लयास गेली.
 
शिवकालीन किल्ल्यांचा वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून अभ्यास कमी झाला आहे. पण काही किल्ले वास्तुशास्त्राप्राणे बांधले आहेत. सुरक्षा हा किल्ला बांधतानाचा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानुसार   निवास, घोडदळ, पायदळ, भटारखाना इत्यादी व्यवस्था असे. नैऋत्य दिशेला राजाच्या निवासाची व्यवस्था असेल तर त्या राजाला स्थैर्य मिळते. राजाची वास्तू उंच असल्याने शत्रूची हालचाल टिपता येत असे. प्रत्येकाला विशेष दिशा व जागा असायची. त्यामुळे राज्याची व्यवस्था  सुरळीतपणे चालायची. सूत्रसंचालन राजीव गायकवाड यांनी केले तर आभार नामदेव थोरात यांनी मानले.