testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

डॉ. भारती लव्हेकर यांनी दिली 'प्लास्टिक फ्री वर्सोव्या'ची घोषणा

Tee Foundation
Last Updated: बुधवार, 2 मे 2018 (11:07 IST)
१ मे २०१८ : महाराष्ट्र दिवसाचे निमित्त साधून 'ती फाऊंडेशन' आणि ऍक्वाक्राफ्ट प्रोजेक्ट्स प्रा. लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्सोव्याला प्लस्टिकच्या समस्येतून मुक्त करण्याच्या दृष्टीने एक अद्वितीय पाऊल उचलत आहे. महाराष्ट्र सरकारने 'प्लॅस्टिक फ्री महाराष्ट्र' हे मिशन हाती घेतले आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू केली. माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या या स्तुत्य योजनेची अंमलबजावणी म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांनी वर्सोवा प्लास्टिक मुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. डॉ. भारती लव्हेकर यांच्या 'ती फाऊंडेशन' आणि ऍक्वाक्राफ्ट प्रोजेक्ट्सच्या ‘स्वच्छाग्रह' कार्यक्रमांतर्गत वर्सोव्याला प्लास्टिकच्या कचाट्यातून मुक्त करण्याचा शुभारंभ आज झाला.

' स्वच्छाग्रह’हा एक सामाजिक विकास उपक्रम असून ही एक चळवळ आहे, जी संपूर्ण देशामध्ये स्वच्छतेच्या प्रश्नांवर उपाययोजना योजून त्याचे समाधान करते. स्वच्छतेची विविध अंगे जशी स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छता. स्वच्छ ह्या शब्दातून 'स्व'च्छता' ('सॅ'निटेशन) आणि 'पाणी' ('वॉ'टर) या दोन्हीसाठी परिवर्णी शब्द आहे. 'स'माजाचे ('क'म्युनिटी ) 'आ'रोग्य ('हे'ल्थ) आणि स्वच्छता ('हा'यजिन). तर 'आग्रह' हे सर्व स्वयंसेवक, देणगीदार, स्वयंसेवी संस्था, सामाजिक वित्तीय संस्था, कॉर्पोरेट्स, बहुपक्षीय एजन्सीज, निवडून आलेले लोक प्रतिनिधी, जसे नगरसेवक/ आमदार / खासदार / शासकीय आणि संस्थात्मक घटक, शैक्षणिक संस्था यांना या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठीचे आमंत्रण आहे.

याप्रसंगी बोलताना 'ती फाऊंडेशन'च्या संस्थापक अध्यक्षा आणि वर्सोवा विधासभेच्या आमदार माननीय डॉ. भारती लव्हेकर म्हणतात, “माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्लास्टिक बंदीच्या अभिनव योजनेतून प्रेरणा घेऊन, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आज 'ती फाऊंडेशन'आणि ऍक्वाक्राफ्ट प्रोजेक्ट्स प्रा.लिमीटेड संयुक्तरित्या ‘प्लॅस्टिक फ्री महाराष्ट्र’सुरू करण्याच्या दृष्टीने हा पुढाकार घेत आहोत आणि त्याची आज सुरुवात होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या चळवळीचा मुख्य उद्देश प्लास्टिकचा कमीत-कमी वापर करणे आणि अखेरीस संपूर्ण महाराष्ट्रातून प्लस्टिकचे समूळ उच्चाटन करणे हा असणार आहे. या उपक्रमाची सुरुवात वर्सोवा या माझ्या मतदारसंघातून होणार असल्याने मला अतिशय आनंद होत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत, ऍक्वाक्राफ्ट ग्रीन ऍक्वाटएम ही पाण्याची एटीएम मशीन्स विविध ठिकाणी बसवण्यात येतील. विविध ठिकाणची ऑफिसेस, महाविद्यालये, बाजारपेठ, मॉल, पोस्ट ऑफिस, पोलिस स्टेशन, रुग्णालये इ. ठिकाणी लावण्यात येतील. महिलांद्वारे चालवण्यात आलेली, महिलांच्या मालकीची असलेले महिला बचत गटांना, मुद्रा तसेच पीएमईजीपी योजने अंतर्गत आर्थिक कर्ज उपलब्ध होईल. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे महिला सशक्तीकरणाचे उद्दिष्ट साकारण्याच्या दृष्टीने उचलले हे एक पाऊल आहे. ह्या महिला बचत गटांना मातीची भांडी आणि मातीची बाटल्यांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. ऍक्वाटम्सच्या ठिकाणी महिला बचत गटांच्या महिलांना बसण्यासाठी जागा दिली जाईल. एक्वाटम्स म्हणजे जिथे पाणी आयआरसीटीसी ने पुनर्निर्धारित केलेल्या दराने विकले जाईल. ३०० मिलि साठी १ / रू., ५०० मि.ली. ३/- १ लिटर साठी रु. ५ / आकारण्यात येतील. हळूहळू प्लॅस्टिक बॉटल्सचा वापर कमी -कमी होत जाईल आणि महिला बचत गटांच्या महिलांना रोजगारही उपलब्ध होईल.
डॉ. सुब्रह्मण्य कुसनूर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय एक्काक्राफ्ट प्रकल्प संचालक प्रा. लिमिटेड. म्हणतात, "प्लॅस्टिक फ्री महाराष्ट्र" हे एक अद्वितीय पुढाकार आणि चळवळ आहे जे कौशल्य विकास, आजीविका सक्षम करते निर्मिती, महिला सशक्तीकरण करताना निरंतर स्वच्छ पिण्यायोग्य पाणी पुरवणे, पाणी पुरवठा पर्यावरणाचा आदर करताना सर्वात स्वस्त दरात दरात पाणी उपलब्ध करून देते. आमच्या ग्रीन एक्वाटम्सची ठळक वैशिष्टये म्हणजे पाण्यातून अनावश्यक घटक दूर करून पाणी पिण्यायोग्य बनवणे, पाण्यातून कचरा अन्य घटक काढणे, आणि स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणे ही आहेत. आम्हाला आज अतिशय आनंद होतो कि डॉ. भारती लव्हेकर या पहिल्या आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत ज्या आमच्या ऍक्वाक्राफ्ट प्रोजेक्ट्सच्या ‘स्वच्छाग्रह’या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत."


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

शरद पवारांची मोदींवर टीका

national news
बळीराजाशी बेईमानी करणाऱ्या भाजपाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आधी आश्वासनं द्यायची आणि ...

कांदा उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

national news
कांद्‍याचे भाव पडल्‍याने उत्‍पादन खर्च निघत नसल्‍यामुळे एका शेतकर्‍याने आत्‍महत्‍या ...

गरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार

national news
महाराष्ट्र सरकारने डान्सबार परवान्यासाठी घातलेल्या जाचक अटी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ...

'डान्सबार'वरील बंदी उठणे, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस

national news
डान्सबारला पुन्हा परवानगी मिळणे हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे अशी तीव्र प्रतिक्रिया ...

Motorola Razr आता फोल्डेबल स्मार्टफोनच्या रूपात

national news
Motorola चा प्रतिष्ठित फोन Motorola Razr नवीन लुकमध्ये लाँच होऊ शकतो. Motorola Razr ची ...