testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैशे मिळतील का?

property
Last Modified शनिवार, 28 एप्रिल 2018 (14:25 IST)
वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही "Affcource !" असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो !

तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये पैशे टाकले असतील पण तुमच्या नंतर हे पैशे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का ?

'Nomination' बद्दलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का ?

तुम्ही आयुष्यात ज्यांच्यासाठी मेहनत घेता, काबाड कष्ट करता, इन्वेस्टमेंट करत असता, ती असतात तुमची मूल, बायको, आई, बाबा आणि भावंड जर आपल्याला काही झाले तर तुम्ही यामधील कुणालातरी नॉमिनी सुद्धा केलेलं असत पण तुमच्या नंतर पूर्ण पैसा तुमच्या नॉमिनीलाच मिळेल का ?

तर उत्तर आहे - नाही

शॉकिंग ?

खालील उदाहरण पहा !

महेश हा ५५ वर्षाचा माणूस आहे ज्याचे आपल्या मुलांशी अजिबात पटत नाही. महेशने आपली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मधील संपूर्ण मिळकत बायको च्या नावे नॉमिनी म्हणून ठेवलेली आहे.

अचानक महेशचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यातच त्याच निधन होत. त्याने बायकोलाच नॉमिनी ठेवलेलं होत पण मूल संपत्ती साठी कोर्टात गेली, कोर्टाने इन्शुरन्स व म्युच्युअल फंडातील संपत्तीचे बायको आणि मुलांनमध्ये समान भाग केले. आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला छोटासा हिस्साच फक्त आला !

असे का झाले ?

महेशने बायको ला नॉमिनी ठेवले होते पण त्याने 'legal will' बनवले नव्हते. त्यामुळे त्याच्या नंतर त्याच्या संपत्तीची वाटणी ही 'Succesion Law'(वारसा हक्क) नुसार झाली आणि सर्व 'Legal Heir'(वारसदार) मध्ये
समान वाटणी झाली.

'Succession Law' समजून घ्या !

'Succession Law' नुसार नॉमिनी हा फक्त असेट्सचा (पैशाचा) Trustee आहे मालक नाही. त्याचे काम हे फक्त नॉमिनेटेड मालमत्तेची काळज़ी घेऊन ती legal Hairs ला सुपुर्द करण्यापर्यंत मर्यादित आहे.

नॉमिनी अस्सेट ला होल्ड करू शकतो पण अस्सेट (पैशाचे) चे खरे मालक हे तुमचे 'Legal Heir' च असतात.

मग 'Legal Heir' कोण असतात?

'Legal Heir' ते असतात जे Succession Act मधे नमूद केलेले आहेत.

जर तुम्ही Will बनविली असेल तर मात्र संपत्तीचे वाटप Will नुसार होते आणि जर तुम्ही 'legal Will' नाही बनवली आहे तर 'Succesion Law' नुसार तुमचे 'Legal Heir' ठरवले जातात.

'Succession Law'चे कायदे हे इन्वेस्टमेंट नुसार बदलतात म्हणजे तुम्ही केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स यांसाठी थोडे वेगवेगळे कायदे आहेत.

मित्रानो इन्वेस्टमेंट करणे ही काळाची गरज आहे तेवढेच त्याचे लीगल कायदे माहिती असणे हे सुद्धा महत्वाचे आहे.

नाहीतर तुमची जीवनभराची पुंजी अशीच वाटली जाईल आणि तुमच्या नॉमिनी ला हवा तेवढा फायदा होणार नाही! नॉमिनी ट्रस्टी प्रमाणे असतो.

मृत्यूपत्र, सर्व वारसांची त्याला मान्यता आणि जर मान्यता नसेल तर कोर्टाची ऑर्डर (probate) हे महत्वाचे!
आपल्यानंतर आपल्या संपत्तीवरुन आपल्या वारसांमधे भांडणे होऊ नयेत तसेच ती संपत्ती योग्य व्यक्तीकडे जावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर मृत्यूपत्र बनवणे अतिशय महत्वाचे असते.

सर्व साधारण लोकांचा हाच समज असतो की नाॅमिनेशन केले की आपण ज्याच्या नावाने नाॅमिनेशन केले आहे त्यालाच पैसे मिळतील. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. जर तुमचे वारस कोर्टात गेले तर तुमचे पैसे, तुमची प्राॅपर्टीचा समान हिस्सा तुमच्या वारसांना मिळतो.

सगळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती आहे वाचा व वेळीच
सावध व्हा...

माधव कुलकर्णी
अँडव्होकेट
मुंबई हायकोर्ट.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

किमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला

national news
वाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...

बाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली

national news
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...

व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’

national news
व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...

ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार

national news
पुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...

#metoo मीटू मीटू

national news
सध्या सोशल मिडीयावर धमाकेदार अन मीटूमीटू चर्चा चालू आहे. विनयभंग असेल बलात्कार असेल ही ...