शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (15:39 IST)

कुंभकर्णी सरकार कधी जागे होणार

शालेय जिवणात शिक्षकाच महत्व खुप असतं. आपण शिक्षकांना गुरु मानत असतो. शिक्षकांकडून मुले आदर्श घेत असतात. शिक्षकाकडे खरतर सध्यांच शिक्षण मंत्रालय दूर्लक्ष करत आहे. आज ही बर्याच शाळा विना अनुदानित आहेत. लेखात अशा शिक्षकांची व्यथा मांडणार आहे ज्यांनी 20 ते 25 वर्ष नौकरी करुनही आजही पगार नाही. एवढे वर्ष सरकार काय झोपलय काय?
 
1993 ची गोष्ट आहे गावी आजोबांनी संस्था स्थापन केली अन त्या नवीन शिक्षक भरती केली. सर्वच नवीन शिक्षक चांगले काम करत होते आजही करतात. एका दाखल्यापासून तर आज 350 विद्यार्थांचे दाखले शाळेत आहेत. पुढे एका शाखेचे दोन शाखा झाल्या एक टाकरखेडा अन एक ढेकू आशा दोन ठिकाणी शाखा झाल्या. ढेकू गावातील सर्वच शिक्षकांनी मेहनत घेवून ही सर्वांना 10 वर्ष पगार नव्हता. मग पुढे माझे स्वत:चे वडील यांनी खुप मेहनत घेवून शाळेला मान्यता आणली तीही 10 वर्षांनी शाळेला मान्यता मिळाली. वडील दर वेळेला जळगाव नाशिक फिरायचे पण काही उपयोग होत नव्हता मग काय शेवटी जळगावात 2001 मध्ये अरुण भाई गुजराथी यांची शिक्षण मंत्री असताना पाणी प्रश्नाची बैठक होती वडीलांना मंत्र्या पर्यंत पोहचणे अवघड होतेच पण मोठ्या मेहनतीने ते अरुण भाईंपर्यत पोहचले अक्षरश : ते रडले कारण गोष्टही तसीच होती त्या काळच्या सरकारने शाळा आदीवासी मध्ये टाकली होती विना अनुदानीत मग काय शेवटी सर्व अरुण भाईंनी ऐकल्यावर लेटर पँड वर लिहून दिल मान्यता मिळवुन दिली. पहीला पगार मिळाला तोही दहा वर्षांनी काय म्हणावे त्या शिक्षकांना ज्यांनी एवढी मेहनत करुण फुकट राबून शिक्षक म्हणून काम केले?
 
दुसरी शाळा म्हणजे टाकरखेड्याची शाळा आजही त्या शाळेला माऩ्यता नाही चार शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. बिच्यार्यांची परीस्थिती बघवत नाही आजही ! कधी मिळेल न्याय त्यांना 25 वर्ष झाली मान्यता नाही सरकार काय अजून ही झोपा काढत आहे का ? आत्महत्या केलेल्या शिक्षकांची जबाबदारी कोण घेणार कधी सरकार ला जाग येणार ? शेतातही जातात सालदारासारखे राबतात ही ,असली शिक्षकांची परीस्थिती असेल तर काय करावे ? कधी मिळेल मान्यता त्या शिक्षकांना कधी त्यांचा वनवास संपेल? त्यांचा तळतळाट नक्कीच सरकारला लागणार यात काळी मात्र शंका नाही ?
 
अशी परीस्थिती महाराष्टातील बर्याच शाळांची आहे. आजही बरीच भरती व्हायचीय समायोजन व्हायचय कधी लक्ष देणार सरकार अन ही परीस्थिती कधी बदलणार ? 
 
Virendra Sonawane