१०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थातच कर्मचारी निवड आयोगाकडून २५ मार्च २०२१ रोजी लष्करात भरतीसाठी कॉन्स्टेबल जीडी भरती परीक्षेची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. या भरतीतून हजारो तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. अधिसूचना जाहीर होताच नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख १० मेस निश्चित केली गेली आहे.
कॉन्स्टेबल जीडी पदांसाठी संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा २ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२१ दरम्यान घेतली जाईल. भरती परीक्षेद्वारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखील पोलिस दल, भारतीय तिबेट सीमा पोलिस दल, सशस्त्र सीमा दल, विशेष सुरक्षा दल, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, आसाम रायफल दलासह इतर दलांमध्ये भरती केली जाणार आहे.
परीक्षेसाठी काय आहेत निकष
या भरती परीक्षेसाठी उमेदवारानं दहावी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षे असावे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ ssc.nic.in वर अर्ज करण्यास पात्र असतील.