उत्तर प्रदेश पोलिसात सब इंस्पेक्टर पदांसाठी 9534 भरती, अर्ज कसे करावे जाणून घ्या
उत्तर प्रदेश पोलिस भरती आणि प्रोन्नती बोर्डाने प्रदेशात सब इंस्पेक्टर पोस्टासाठी 9534 भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यापैकी सिव्हिल पोलिस (महिला आणि पुरुष) यासाठी 9027 पद आहेत. प्लाटून कमांडर / सब-इंस्पेक्टर सशस्त्र पुलिस (पुरुष) यासाठी 484 पद आहे आणि फायरमॅन सेकंड पदासाठी 23 पद आहे. बोर्डाने या जागांसाठी आधिकृत सूचना जारी केल्या आहेत.
आधिकृत नोटिसप्रमाणे, 9534 पदांसाठी भरती प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरु होतील, ज्यासाठी लिंक uppbpb.gov.in वर उपलब्ध आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार 30
एप्रिल, 2021 पर्यंत यूपी पोलिस भरती 2021 साठी अर्ज करु शकतात.
यूपी पोलिस भरती 2021:
निवड प्रक्रिया - सर्व उमदेवारांची निवड ऑनलाइन लिखित परीक्षा, पीएसटी, पीईटी, अंतिम सूची आणि मेडिकल परीक्षा यात प्रदर्शनाच्या आधारावर केले जाई,.
पगार: पे बैंड 9300-34800 आणि ग्रेड पे 4200 रुपये.
शैक्षणिक योग्यता:
सर्व उमेदवारांना एखाद्या मान्यता प्राप्त विश्वविद्यालय / संस्थानाहून कोणत्याही स्ट्रीममध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. फायर ब्रिगेड सेकेंड क्लाससाठी साइंसमध्ये ग्रॅज्युएट.
वयोमर्यादा:
इच्छुक उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्ष दरम्यान असावे. अर्थात जन्म 1 जुलै 1993 हून पूर्वीचा व 1 जुलै 2000 नंतर नसावा. उत्तर प्रदेशातील एससी, एसटी, ओबीसी वर्गासाठी वयमर्यादा यात 5-5 वर्षाची सूट असेल.
अर्ज कसे करावे:
उमेदवार 1 एप्रिलपासून अधिकृत वेबसाइट - uppbpb.gov.in वर निर्धारित प्रारूपात अर्ज करु शकतात.