मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: मंगळवार, 27 मार्च 2018 (14:32 IST)

रोडट्रीप साठी सज्ज व्हा “या”कुल ड्रेसिंगसह

एप्रिल महिना सुरु झाला की सर्वांचे कुठे ना कुठे फिरण्याचे प्लॅन बनू लागतात. वेगवेगळ्या लोकेशन्स पासून ते कोण कोण गॅंग मध्ये सामील होणार याची यादी बनवली जाते. आजकाल सर्वांना आपल्या सोशल मीडियामध्ये अपडेटेड राहण्यास आवडतं. आपल्या सोशल मीडियावर सर्वात कुल आपलेच फोटो असावे असे सर्वानाच वाटते. म्हणूनच आजच्या तरूणाईसाठी ड्रेसिंग हा ट्रिपचा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग ठरत आहे. गॅंगमध्ये आपला लूक सर्वात हटके असावा यासाठी यंगस्टर्स आटापिटा करत असतात. कुल म्हणजे काहीतरी फंकी अडकवून स्टाईल स्टोटमेंट बनत नाही, तर त्यासाठी तसा ड्रेसिंग सेन्सही असावा लागतो. याव्यतिरिक्त प्रत्येक जण सध्या कोणत्याही सेलिब्रिटी, किंवा त्यांचे आयडॉल तसेच निवडक डिझायनर्सला फॉलो करत असतात. अशाच काही उन्हाळ्यातील कुल ड्रेसिंग स्टाईल्स जाणून घेऊयात स्पायकर इंडियाच्या समर कलेक्शनमधून. 
पेस्टल : जर तुमचा कोणत्या तरी बीचवर जाण्याचा प्लॅन असेल तर पेस्टल कलर हा ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल. अगदी हलक्या रंगाचे हे कपडे गरम वातावरणातही एकदम "कुल" लूक देऊन जातात. त्यात यावर फ्लोरल प्रिंट, एखादी छानशी हॅट आणि कुल एविएटर सनग्लासेस एकदम झक्कास दिसतील. 
कॅमोफ्लॉज : काही ट्रॅव्हलर्स ना बीच ट्रीपच्या ऐवजी ट्रेकिंग किंवा एडव्हेंचर ट्रिप्सला जाण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्यासाठी खास कॅमोफ्लॉज प्रिंटचे कपडे डिझाईन केलेले आहेत. मिलिटरी प्रिंट्सचे हे आऊटफिट तुम्हाला तुमच्या हटके डेस्टिनेशनला व ट्रिपला "राऊडी" लूक देऊन जातो. 
फंकी चेक्स : चेक्स हा तर सर्वांचाच “एनी टाईम फेव्हरेट" ड्रेसिंग स्टाईल आहे. समर ट्रिपमध्ये चेक्स टॉप किंवा चेक्स शर्टसोबत कलर डेनिम हा हटके पर्याय आहे. एखादा गडद रंगाचा चेक्स शर्ट समरमध्ये तुम्हाला सेंटर ऑफ अट्रॅक्शन चा फिल देईल. 
डेनिम : स्पायकर इंडिया डेनिम साठी प्रसिद्ध आहे. समर कलेक्शनमध्ये मुलींसाठी खुप ऑप्शन आहेत, जसे कि एखाद्या गडद डेनिम सोबतच लाईट रंगाचा डेनिम शर्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डेनिम टॉप्स आणि वन-पीस असे बेस्ट ऑप्शन ट्रिपसाठी उपलब्ध आहेत. 
 
ज्या ठिकाणी आपण ट्रिप ला जात आहोत त्याप्रकारचे ड्रेसिंग करणे हे सर्वात महत्वाचे आहे, आणि म्हणूनच स्पायकर इंडियाने हीच संकल्पना जाणून युवकांसाठी हे कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे. तर तुम्हीही तुमचा समर करा "स्टायलिश !"