गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

भरलेली शिमला मिरची रेसिपी

Stuffed Capsicum Recipe
साहित्य-
चार मध्यम आकाराचे शिमला मिरची
दोन मध्यम आकाराचे बटाटे
एक मोठा कांदा
दोन मध्यम आकाराचे टोमॅटो
दोन हिरव्या मिरच्या
एक इंच आले
चार लसूण पाकळ्या
अर्धा कप कोथिंबीर
चार लवंगा
अर्धा टीस्पून गरम मसाला
एक टीस्पून धणे पूड
1/4 टीस्पून हळद पावडर
तिखट  
मीठ
कृती-
सर्वात आधी शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्या. व त्यातील बिया काढून घ्या. यानंतर बटाटे उकडवून मॅश करावे.आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून कांदा घाला आणि तो सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर, टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि लसूण घाला आणि सर्वकाही चांगले शिजवा. या मिश्रणात मॅश केलेले बटाटे, कोथिंबीर,लवंगा, गरम मसाला, धणे पूड, हळद, तिखट आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता हे स्टफिंग सिमला मिरचीच्या आतमध्ये भरावे. यानंतर, एका पॅनमध्ये थोडे तेल टाका आणि ते गरम करा. आता त्यामध्ये शिमला मिरची ठेवा. आता भांडे झाकून ठेवा आणि शिमला मिरची काही वेळ शिजू द्या. तर चला तयार आहे आपली भरलेली शिमला मिरची रेसिपी, पोळीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik