उरलेल्या वरण-भातापासून बनवा स्वादिष्ट पकोडे रेसिपी
साहित्य-
एक कप उरलेले वरण
एक कप उरलेला भात
एक कप बेसन
हिरव्या मिरच्या तुकडे केलेल्या
एक टीस्पून आले किस
एक टीस्पून जिरे
चिमूटभर हिंग
कोथिंबीर
तेल
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये बेसन घ्यावे व ते व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यावे. आता यामध्ये वरण भात, आले, जिरे, हिंग, कोथिंबीर घालून घट्ट बॅटर बनवून घ्यावे. आता एका कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवावे. आता बाऊलमधील बॅटरचे पकोडे बनवून चांगले क्रिस्पी तळून घ्यावे.तर चला तयार आहे उरलेल्या वरण भातापासून क्रिस्पी पकोडे रेसिपी, पुदिना चटणी किंवा सॉस सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Edited By- Dhanashri Naik