1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : रविवार, 30 मार्च 2025 (09:56 IST)

Gudi Padwa Special श्रीखंड पुरी रेसिपी

Shrikhand puri
श्रीखंड 
साहित्य-
दही- एक किलो
साखर-एक किलो
केशर 
वेलची पूड -अर्धा चमचा
जायफळ पूड- अर्धा चमचा 
चारोळी 
ड्रायफ्रूट्स 
कृती-
सर्वात आधी दही स्वच्छ पातळ कापडात घालावे आणि वरती लटकवून ठेवावे. कमीतकमी चार ते पाच तास असेच ठेवावे जेणेकरून त्यातील पाणी निघून जाईल. आता नंतर दही एका भांड्यात काढावं. त्यात साखर मिसळावी. आता दही पुरणयंत्रातून फिरवून घ्या.आता ते एका भांड्यात काढून त्यात वेलची पूड, जायफळपूड, दुधात भिजवलेले केशर, केशरी रंग मिसळा. तसेच हे चांगल्याप्रकारे मिक्स करा म्हणजेच फेटून घ्या. आता फ्रिजमध्ये ठेवून द्या. थंड झाल्यावर त्यामध्ये सुके मेवे, चारोळी घालावी. तर चला तयार आहे आपली श्रीखंड रेसिपी. 
पुरी
साहित्य 
गव्हाचे पीठ 
चवीनुसार मीठ 
तेल 
साखर 
पाणी 
 
कृती-
सर्वात आधी एका परातीमध्ये दोन कप पीठ घ्यावे. आता त्यामध्ये मीठ, तेल मोहनकरीता घालावे तसेच चिमूटभर साखर घालावी. साखर घातल्याने पुऱ्या छान फुलतात. आता हे सर्व मिक्क्स करून घ्यावे. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यावा. आता कमीतकमी पाच मिनिट गोळा तसाच ठेवा. आता एका कढईमध्ये तेल चांगल्या प्रकारे गरम करावे. आता मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या. व छान तळून घ्या. आता तयार पुरी एका प्लेट मध्ये ठेवा. तर चला तयार आहे आपली पुरी रेसिपी, श्रीखंड पुरीचा नैवेद्य गुढीपाडवा या दिवशी नक्की बनवा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik