1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 29 मार्च 2025 (06:31 IST)

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

Hindu New Year 2025: वर्ष २०२५ मध्ये 30 मार्चपासून हिंदू नववर्ष म्हणजेच नव संवत्सराची सुरुवात होत आहे. वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षाच्या आधी काही वस्तू घराबाहेर फेकून द्याव्यात. असे केल्याने त्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम जीवनावर होत नाही. हिंदू पंचागानुसार पहिला महिना चैत्र असतो.
 
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रीची सुरुवात होते. यामुळे हा काळ खूप पवित्र मानला गेला आहे. २०२५ मध्ये विक्रम संवत २०८२ चा शुभारंभ होईल. हे संपूर्ण वर्ष भाग्यवान आणि आनंद आणि समृद्धीने भरलेले बनवण्यासाठी, तुम्ही घरातून काही वस्तू काढून टाकल्या पाहिजेत. घरात कोणत्या गोष्टी ठेवू नयेत ते जाणून घेऊया.
 
फुटक्या वस्तू- आपल्या घराच्या स्टोअर रूममध्ये फुटके काच, फर्नीचर, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, बंद घड्याळ आणि तुटलेल्या मुरत्या असतील तर नववर्षापूर्वी या वस्तू घरातून बाहेर काढून टाका. या प्रकाराच्या अटाळ्यामुळे जीवनात नकारात्मकता येते. वास्तुशास्त्रानुसार घरातील तुटलेल्या वस्तूंमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
 
फाटलेले जुने कपडे- जे काही कपडे किंवा बूट फाटलेले असतील किंवा जुने झाले असतील ते दान करावेत. असे कपडे घरात ठेवू नयेत. असे मानले जाते की अशा वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते.
 
अटाळा- घरात ठेवलेला कचरा, जुन्या वस्तू, रद्दी, जुन्या पुस्तके-प्रती इत्यादी हिंदू नववर्षापूर्वी घराबाहेर काढाव्यात. घरातून या वस्तू काढून टाकल्याने सुख आणि समृद्धी येते.
 
वाळलेली झाडे- घरात सुकलेली रोपे ठेवू नयेत. वास्तुनुसार, घरात कोरडे आणि वाळलेले रोपे ठेवल्याने दुर्दैव येते.
 
जुनी औषधे- कालबाह्य झालेली किंवा जुनी औषधे घरी ठेवू नयेत. त्याचप्रमाणे हिंदू नववर्षापूर्वी घरातून कोणत्याही प्रकारच्या जुन्या सौंदर्यप्रसाधनांच्या वस्तू काढून टाकल्या पाहिजेत.
बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू- घरात बंद पडलेले घड्याळ किंवा खराब झालेले इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नयेत. असे मानले जाते की या गोष्टी नशिबात अडथळा निर्माण करतात.
 
तुटलेल्या मूर्ती- घरात तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत. नवीन वर्षाच्या आधी हे देखील घराबाहेर फेकून द्यावे. जर या देवाच्या मूर्ती असतील तर त्या वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक शास्त्रांच्या श्रद्धेवर आधारित आहे आणि ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.