गुरूवार, 6 मार्च 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मार्च 2025 (15:15 IST)

Gudi Padwa 2025: गुढीपाडवा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या

gudi padwa
Gudi Padwa 2025 हिंदू पंचगानुसार गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. वर्ष 2025 मध्ये गुढी पाडवा कधी आहे? आणि कशा प्रकारे उभारावी गुढी तसेच मुर्हूत काय सर्व जाणून घ्या- 
 
शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
 
गुढीपाडवा 2025 तिथी आणि मुहूर्त
गुढीपाडवा हा सण रविवार, मार्च 30, 2025 रोजी साजरा केला जाईल.
प्रतिपदा तिथी प्रारम्भ - मार्च 29, 2025 रोजी 16:29:48 पासून
प्रतिपदा तिथी समाप्त - मार्च 30, 2025 रोजी 12:51:50 मिनिटापर्यंत
 
गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्व
गुढी पाडव्याचा शब्दशः अर्थ गुढी म्हणजे ध्वज आणि पाडव्याला प्रतिपदा तिथी म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. गुढीपाडव्याला, सर्व लोक ब्रह्माची पूजा करतात ज्यांना विश्वाचे निर्माता म्हटले जाते. शास्त्रांनुसार आणि अनेक मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली.
 
या दिवशी महाराष्ट्र राज्यात एक वेगळीच वैभव आणि भव्यता दिसून येते. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि त्यामुळे नशीब आणि समृद्धी देखील मिळते अशी पौराणिक मान्यता आहे. गुढीपाडवा हा खूप शुभ दिवस आहे आणि या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होते.
गुढी पाडवा महत्व
14 वर्षांचा वनवास पूर्ण करून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अयोध्येत परतल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.
असे मानले जाते की या दिवशी सम्राट शालिवाहनचा शकांवर विजय साजरा करण्यासाठी लोकांच्या घरात गुढी बसवली जात असे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी काही लोक गुढीची स्थापना करतात.
या दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली अशी धार्मिक श्रद्धा आहे, म्हणून गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते. त्याला इंद्रध्वज असेही म्हणतात.
गुढी लावल्याने घरात समृद्धी येते असे मानले जाते.
गुढीला धर्मध्वज असेही म्हणतात; म्हणून त्याच्या प्रत्येक भागाचा एक विशेष अर्थ आहे जसे की उलटी पात्र डोके दर्शवते तर काठी पाठीच्या कण्याला दर्शवते.
रब्बी पिकाची कापणी केल्यानंतर पुन्हा पेरणी केल्याच्या आनंदाचे प्रतीक म्हणून शेतकरी हा सण साजरा करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी, शेतकरी चांगले पीक मिळावे म्हणून प्रार्थना करण्यासाठी आपल्या शेतात नांगरणी करतात.
हिंदू धर्मात, वर्षभरातील साडेतीन मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. हे साडेतीन शुभ काळ पुढीलप्रमाणे आहेत - गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी हे अर्धे शुभ काळ मानले गेले आहेत.
 
गुढी पाडव्याचे कार्यक्रम
देशाच्या वेगवेगळ्या भागात गुढी पाडवा अनेक प्रकारे साजरा केला जातो.
गोवा आणि केरळमधील कोकणी समुदाय गुढी पाडवा हा संवत्सर पाडवा म्हणून साजरा करतो. 
कर्नाटकात हा सण युगादी या नावाने प्रसिद्ध आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढी पाडवा हा उगादी म्हणून साजरा केला जातो. 
हा दिवस काश्मिरी हिंदू नवरेह म्हणून साजरा करतात. 
गुढी पाडव्याला मणिपूरमध्ये साजिबू नोंगमा पानबा किंवा मेईतेई चेइराओबा म्हणतात. 
चैत्र नवरात्र गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होते.
गुढी कशी उभारावी?
घरात, अंगणात, किंवा गच्चीवर जिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करा. 
रांगोळी काढा. नवीन कपडे घालून तयार व्हा. गुढीची स्थापना करायची असेल तेथे अक्षता ठेवा त्यावर स्वस्तिक काढा. 
गुढी उभारुन गुढीला हळद आणि कुंकू अर्पण करा. नैवेद्य दाखवा.