प्रत्येक सणाला रांगोळी काढण्याचे महत्त्व आहे. रांगोळी शिवाय सणासुदीची पूर्णता नसते. हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे 'गुढी पाडवा' चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा हा सर्वात मोठा सण आहे. या दिवसापासून हिंदू नवीन वर्षारंभ होतो. झाडांना नवी पालवी फुटतात. नवीन स्वप्न नवीन ध्येय घेऊन पुढे वाटचाल करण्याची सुरुवात करणारा दिवस म्हणजे गुढी पाडवा आहे. या दिवसापासून हिंदूचे नवीन संवत्सर बदलते. या दिवशी घरोघरी गुढी उभारतात. या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला. या दिवशी घरो घरी गुढी उभारून दाराबाहेर मोठ्या रांगोळ्या काढतात. आज आम्ही आपल्याला गुढीपुढे आणि दारापुढे काढणाऱ्या काही रांगोळ्यांचे डिझाईन दाखवत आहोत.
चटक रंगांचा वापर करुन ही सोपी डिझाईन तयार करता येईल.