शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (19:57 IST)

Look cool in the office: लूक कूल इन ऑफिस

formal clothes
Look cool in the office मित्रांनो, ऑफिसला जायचं म्हणजे फारच फॉर्मल दिसलं पाहिजे, असं काही नाही बरं का! काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्हीही ट्रेंडी दिसू शकता. ऑफिस लूकला हटके बनवायच्या या काही टिप्स... 
 
1. ऑफिसचा पेहराव निवडताना किंवा शिवून घेताना फिटिंगकहे लक्ष द्या. 
 
2. तुम्ही ऑफिसला निघालात म्हणून काळा, पांढरा, ग्रे असे टिपिकल रंग निवडण्याची काहीच गरज आही. लवेंडर, येलो, पिंक असे रंग ट्राय करा. प्लेन शर्ट घालायचा नसेल तर चेक्स किंवा स्ट्राईप्सचा ऑप्शनही आहेच. 
 
3. शाळेत असताना तुम्ही काळे बूट घातले असतील. आता ऑफिसमध्येही काळेच बूट घातले पाहिजे असं नाही. गेट ट्रेंडी यार. बुटांच्या रंगात एक्सपिरिमेंट करायला काहीच हरकत नाही. ब्राऊन, टॅन किंवा ऑक्सब्लड या रंगाचे बूटही ट्राय करता येतील. बेल्ट शूजच्या रंगाला मॅचिंग असतील हे बघा. बेल्टच्या वेगवेगळ्या स्टाईल्सही तुम्ही कॅरी करू शकता. 
 
4. खिसा थोडा हलका करावा लागला तरी चालेल पण एक चांगला ब्लेझर आणि स्पोर्ट कोट तुमच्या वॉर्डरॉबमध्ये असू द्या. यामुळे ऑकेजनप्रमाणे तुम्ही तयार होऊ शकाल. एखाद्या फॉर्मल मिटिंगला ब्लेझर घालून जाता येईल. थंडीत स्वेटर्स, वेस्टकोटसोबतही थोडं फार एक्सपिरिमेंट करता येईल. 
 
5. कपड्यांसोबत एखादी नाजूक अॅक्सेसरीही तुमचा लूक हटके बनवायला मदत करेल.