शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

आरामदायक 'ट्रेंडी' पॅन्ट

पॅन्टसोबत साधारण कॉटन शर्ट असो किंवा सिल्क व जॉर्जेटचे शर्ट अगदी सर्व मॅच करतात. एखाद्या डिनर पार्टीत एक शानदार स्कॉर्फ किंवा शालसुद्धा पॅन्ट-शर्ट सोबत छान दिसतो.      
फॅशनच्या जगात महिलांसाठी पॅंटचे पुनरागमन झाले आहे. पॅरिस फॅशन शो असो की लक्मे फॅशन वीक सगळीकडे पॅन्टस् परिधान केलेल्या मॉडेल दिसू लागल्या आहेत. एवढंच नव्हे तर फॉर्मलशिवाय याचा उपयोग कॅजुअल्समध्ये देखील होताना दिसत आहे.

सध्या कॉर्पोरेट कल्चरमुळे कपडे घालण्याच्या पद्धतीत कमालीचा बदल जाणावत आहे. मुली फॅशनसोबतच आरामालाही महत्त्व देत आहेत. म्हणूनच जीन्स-ट्राउजरसारखे कपडे मुलींची पहिली पसंत झाली आहे. पिकनिक, आउटिंग किंवा विकेंडला जीन्स परिधान करताना दिसत आहेत. पण मीटिंग, कॉंन्फरन्स, ऑफिशियल पार्टी किंवा सेमिनारच्या वातावरणात हे फिट बसत नाही. म्हणूनच मुलींनी आता पॅन्ट-ट्राउजरला प्रमुख पोशाखांमध्ये सहभागी केले आहे. त्यातही विविध प्रकार आहेत.- ट्राउजर, सिक्स पॉकेट, कार्गो, बूट कट आदी.

ND
तुम्ही ऑफिस व्यतिरिक्त टी पार्टी किंवा डिनर पार्टीत सिल्क शर्टासोबत पॅन्ट परिधान करू शकता. पॅन्ट आरामदायक असल्यामुळे हल्ली मोठ्या इंन्स्टिट्यूटनी शर्ट-पॅन्ट हा युनिफॉर्म म्हणून स्वीकारला आहे. एअरलाइन्स, हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त काही बँका आणि कॉलेजमध्ये आता मुली युनिफॉर्म म्हणून पॅन्ट शर्ट परिधान करायला लागल्या आहेत. त्याने स्मार्टनेस वाढतोच, आणि धावपळीची कामे सोपी होतात. पॅन्टसोबत साधारण कॉटन शर्ट असो किंवा सिल्क व जॉर्जेटचे शर्ट अगदी सर्व मॅच करतात. एखाद्या डिनर पार्टीत एक शानदार स्कॉर्फ किंवा शालसुद्धा पॅन्ट-शर्ट सोबत छान दिसतो. तसेच त्यावर बीडसची माळ, डायमंड नेकलेस किंवा लॅदर नेकपीस, ब्रेसलेट, लॅदर बेल्ट, कॉर्पोरेट बॅग्सपासून कल्च आणि पर्स हेही मॅच होते. पॅन्ट परिधान केल्यास लेदर शूज, सँडल, ट्रेंडी चप्पलसुद्धा परिधान शकता. त्याचबरोबर आपण पिकनिक आणि खेळण्यासाठी कार्गो किंवा सिंपल बूट कट देखील वापरू शकता.