1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

क्लच निवडताना

तमाम महिलावर्गाला पर्सचं प्रचंड आकर्षण असतं. कितीही पर्स असल्या तरी नवी पर्स खरेदी करायचा मोह होतोच. लग्नसमारंभ किंवा पार्टीला छोटंसं क्लच नेणं हा सध्याचा ट्रेंड आहे. पण क्लच खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवं.
 
* ब्लॅक, न्यूड अणि न्यूट्रल कलर्स कोणत्याही रंगाच्या पेहरावावर उठून दिसतात. तुम्हाला रंगीत क्लच घ्यायचा असेल तर बेज, बॉटल ग्रीन किंवा केनरी येलो यासारखे रंग निवडा. पार्टी किंवा लग्नाला जाताना थोडं फार नक्षिकाम किंवा खडय़ांनी सजवलेला क्लच खरेदी करायला हरकत नाही. 
 
* स्वस्त क्लचचा दर्जा लगेच लक्षात येतो. त्यामुळे उत्तम दर्जाचा लेदर क्लच निवडा. तुम्ही लेदरमध्ये ब्राऊन कलरचा क्लच निवडू शकता. क्लच निवडताना चेन व्यवस्थित आहे का, ते बघून घ्या. लेदर क्लच नको असेल तर कॉर्क क्लच हा एक चांगला ऑप्शन आहे. 
 
* क्लच म्हणजे हातात धरण्यासाठीची पर्स असंच मानलं जायचं. त्यामुळे त्याला बेल्ट नसायचा. प्रत्येक वेळी क्लच हातात ठेवणं शक्य असतंच असं नाही. त्यामुळेच आता क्लचला बेल्ट आणि चेन असतातच. यामुळे क्लच खांद्याला अडकवता येतात. 
 
वर्किग वूमनसाठी हा एक मस्त ऑप्शन आहे. क्लचच्या कप्प्यांकडेही लक्ष द्या. तुम्ही मोठय़ा आकाराचा क्लच घेण्याच्या विचारात असाल तर कमी कप्पे असलेला क्लच निवडा. यामुळे तुमचं सामान व्यवस्थित बसेल. 
 
* तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसारच क्लच निवडा. तुम्ही थोडय़ा जाड असाल तर स्लिक ऑप्शन निवडा. चौकोनी, त्रिकोणी आकाराचा क्लच अशा व्यक्तींना शोभून दिसेल. बारीक अंगकाठी असलेल्या महिलांना गोल आकाराचा क्लच छान दिसेल. 
 
* क्लचचा आकार लहान असतो. त्यामुळे जास्त वस्तू भरल्या की तो वजनदार दिसतो. क्लचमध्ये फोन, लिपस्टीक, दोन चाव्या, पैसे आणि क्रेडिट कार्ड एवढं सामान बसायलाच हवं हे लक्षात ठेवा.
 
आरती देशपांडे