शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

स्टाईलिश राहा पण जरा सांभाळून

हटके दिसायच्या नादात स्त्रियांना नेहमीच काही तरी नवीन करावंसं वाटत असतं. अशात रोजच्या पेहरावात थोडे बदल केले जातात पण ते बदल करण्यापूर्वी काही गोष्ट लक्षात ठेवायला हव्या:



 
* आडव्या रेघांच्या टी शर्ट किंवा कुर्तीमध्ये तुम्ही जाड दिसू शकता म्हणून वजन जास्त असणार्‍यांनी उभ्या रेघांचे कपडे किंवा प्लेन कलरचे कपडे वापरायला हवे.

वजन जास्त असल्यास जीन्स टी शर्ट कॅरी करताना खबरदारी घ्यायला हवी. कारण बसल्यावर पोट ‍जास्त दिसू शकतं. त्यामुळे लूज टी शर्ट घाला किंवा स्टोल कॅरी करा.

* ब्राऊन- व्हाईट, ग्रे- व्हाईट, ग्रीन- ब्राऊन असे कॉम्बिनेशन्स घातल्याने वय अधिक दिसतं. वयापेक्षा कमी दिसण्यासाठी गुलाबी, आकाशी, फ्लोरोसंट असे रंग निवडायला हवे.


 
लाइट कलरचे कपडे घालायचे असतील तर आतले कपडेही लाइट कलरचेच घाला. आतले डार्क शेड वरच्या कपड्यांमधून झाकत असले की वाईट दिसतात.
 
आजकाल मॅचिंगचा जमाना राहिलेला नाही. म्हणून मॅचिंगच लैगिन किंवा दुपट्टा असणे गरजेचं नाही. याव्यतिरिक्त दागिने आणि फुटविअरही मिक्स मॅच करण्याचा ट्रेंड आहे.